Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारावर चाप बसविण्याची स्थायी सभेत मागणी

team by team
March 28, 2022
in राजकीय
0
अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारावर चाप बसविण्याची स्थायी सभेत मागणी

नंदुरबार | प्रतिनिधी
आमच्याही मतदार संघातील विकास कामांना निधी द्या, अशी मागणी करत सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील जिल्हा परिषद सदस्यांनी आज झालेल्या स्थायी सभेतून वॉकआऊट केला. अधिकार्‍यांच्या मनमानी कारभारावर चाप बसविण्याची मागणी यावेळी स्थायी सभेत करण्यात आली.

नंदुरबार येथे जिल्हा परिषदेची स्थायी सभा काल जि.प.अध्यक्षा ऍड. सीमा वळवी, उपाध्यक्ष ऍड. राम रघुवंशी, सभापती रतन पाडवी, निर्मला राऊत, जि.प. अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यासह विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. काल झालेल्या स्थायी सभेत अधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराविरूध्द सर्व सदस्यांनी आवाज उठवत यावर चाप बसविण्याची मागणी केली. दरम्यान सी.के.पाडवी यांनी भगदरी गटात ८४ लाखांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी पाणी पुरवठा योजनांबाबत काय चौकशी केली? असा सवाल जि.प.सदस्यांनी केला. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार यांनी सांगितले की, अक्राणी तालुक्यातील तीनसमाळ येथील पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीने चौकशी केली असून याबाबत ठेकेदार तसेच अभियंता यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डेब्रामाळ येथील पाणीपुरवठा योजनेची त्याठिका जावून दोन दिवसात चौकशी करण्यात येईल असे प्रमोद पवार यांनी यावेळी सांगितले. स्थायी समितीच्या बैठकीत जि.प. उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांनी नंदुरबार येथील गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. गटविकास अधिकार्‍याने फुलसरे येथील शबरी योजनेचे घरकुल वर्ग केले. याबाबत तेथील सरपंच गटविकास अधिकार्‍यांना विचार करण्यासाठी गेले असता गटविकास अधिकार्‍याने सरपंचाला शिवीगाळ करून त्याच्या दालनातून हाकलून लावले. अधिकारी लोकनियुक्त सरपंचाला अशी वागणूक देतात. तसेच पंचायत समितीत झालेल्या कार्यक्रमात अधिकारी वर्ग अनुपस्थित होता. याबाबतही त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी जि.प. उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांनी केली. जि.प. सदस्य देवमन पवार यांनी या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासंदर्भात मागील सभेत ठराव झाला असतांनाही त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे ते पदाधिकार्‍यांना जुमानत नाही असा संतप्त प्रतिक्रीया जि.प.सदस्य देवमन पवार यांनी केली. दरम्यान विविध सभापतींना त्यांच्या मतदार संघात मोठा निधी देण्यात आला. मात्र आम्हालाही निधी द्यावा, अशी मागणी जि.प.सदस्य भरत गावीत, दिपक नाईक, देवमन पवार यांनी लावून धरला. यावेळी चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या जि.प.सदस्य भरत गावीत, दिपक नाईक, देवमन पवार यांनी स्थायी सभेतून वॉकआऊट केला. दरम्यान सभापती रतन पाडवी व सदस्य सी.के.पाडवी यांनी नर्मदा किनार्‍यावरील अंगणवाडयांमध्ये पोषण आहार मिळत नसल्याची तक्रार केली. याबाबत एक महिन्यात अहवाल सादर करण्याचा सूचना यावेळी सभापतींनी केल्या.

महिला बाल विकास विभागाची फाईल हरविली
नंदुरबार येथील जिल्हा परिषदेत झालेल्या स्थायी समितीत चिमलखेडी येथे अंगणवाडीचे चांगले काम झाले असून त्या अंगणवाडीचीच फाईल महिला बाल विकास विभागातून हरविली असल्याचे सी.के.पाडवी यांनी सांगितले. दरम्यान महिला बाल विकास विभाग हा ठेकेदार चालवित असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केली कोषागार कार्यालयाची वार्षिंक तपासणी

Next Post

भाजपाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर : सहा किमीच्या रस्त्याच्या एका टोकाला आमदार तर दुसऱ्या टोकाला खासदारांनी केले भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add