नंदुरबार | प्रतिनिधी
युनियन बँक ऑफ इंडीया शाखा रनाळे यांच्यातर्फे नंदुरबार तालुक्यातील तलवाडे बु. येथे शेतकर्यांसाठी पिक अर्जाचा लाभ कसा होईल. किंवा जास्तीत जास्ते शेतकर्यांनी पिककर्जाचा लाभ घ्यावा. यासाठी रिजनल ऑफीसचे डेप्युटी हेड लकडे व निलेश महाजन यांच्या उपस्थिती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबीरात पिककर्ज विषीय उपयुक्त अशी माहिती यावेळेस निलेश महाजन यांनी ग्रामस्थांनी दिली. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना व जनधन खाते यांच्या विषयी माहिती तलवाडे ग्रामस्थांना देण्यात आली. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी गावागोवी शिबीराचे आयोजन करण्यासाठी विशेष बैठक बोलविली होती. तरी युनियन बँक ऑफ इंडीया शाखा रनाळे यांनी शिबीराचे आयोजन केले.
याप्रसंगी गावाच्या सरपंच सौ. निर्मलाबाई गोकुळ, रनाळे शाखेचे कृषी ग्रामीण विकास अधिकारी श्री.ठाकरे, बँकेचे बँक मित्र मल्हारी पाटील व गावातील ज्येष्ठ नागरीक हिरालाल पाटील, प्रविण पाटील व ग्रामस्थ उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.