Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

team by team
March 25, 2022
in कृषी
0
शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग यांच्या अधिपत्याखालील नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघू प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नदी-नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरू झालेल्या उन्हाळी हंगाम 2021-2022 ( 1 मार्च ते 30 जून 2022) साठी 15 एप्रिल 2022 पर्यंत पाणी अर्ज सादर करायचे आहेत.
सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजूरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. पाणी अर्ज स्विकारण्याची मुदत पुरेशी देण्यात आली असून मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाचे मंजुरी बाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजूरी, ना मंजुरीचा विचार करण्यात येईल.
मंजूरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा, पिकांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी दरसाल दर शेकडा 10 टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळ्या नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे, विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे आदी प्रकाराबाबत नियमानुसार पंचनामे करून दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल.

टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेण्यात यावी. शासनाने काही सवलती दिल्यास त्याबाबत कळविण्यात येईल.
लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्ज क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल, नंदुरबार जिल्ह्यातील काही मध्यम व लघू प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलेला आहे. आरक्षित पाणीसाठा वगळता उपलब्ध पाणी सिंचनासाठी संबंधित उपविभागाद्वारे शेतीसाठी पाणी अर्ज स्विकारले जातील. असे एन. एम. व्हट्टे, कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग, धुळे यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

ट्रालाची चारचाकीला धडक, तीन जण ठार, दोन जखमी

Next Post

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार  शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

नंदुरबार जिल्ह्यातील ५ हजार शेतकऱ्यांना ५९ कोटींचा लाभ

August 8, 2026
भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

भगवान एकलव्य यांच्या पुतळ्याचे डॉ. हिना गावित यांच्या हस्ते अनावरण

August 8, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

August 8, 2026
शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

शहादा-धडगाव रस्त्यावर 59 लाखांचा अवैध गोवा मद्यसाठा जप्त;दोन बोलेरो वाहनांसह एकाला अटक

August 7, 2026
धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

धडगाव तालुक्यातील वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा मार्ग सुकर करा; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके

August 7, 2026
डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ.सुप्रिया गावित यांची भाजपा अनुसूचित जमाती (ST) मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

August 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add