नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबारहून धमडाई येथे जाणाऱ्या गाडीला तळोदा रस्त्यावरील हॉटेल हायवेसमोर चारचाकीला भरधाव वेगाने येणारा ट्रालाने समोरून धडक दिल्याने तीन जण जागीच ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश उर्फ अमृत नारायण सोनवणे व मयत तिघे मारुती इर्टिगा कंपनीची चारचाकी (क्र . जीजे – 15 – सीजी – 0723) ने नंदुरबार कडुन धमडाई कडे २५ मार्च रोजी रात्री एक वाजता जात असतांना समोरुन भरधाव वेगाने येणारा ट्राला (क्र . जी – 18, ए जे – 1763) वरील अज्ञात चालकाने समोरून ठोस दिली.रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून राँग साईडने येवुन ट्राला मध्ये ठेवलेल्या बाहेर निघालेल्या मशिनच्या पत्र्याने इर्टिगा गाडीस ड्रायव्हर साईडला जोरात ठोस मारुन अपघात केल्याने इर्टिका गाडीमधील प्रशांत रमणभाई सोनवणे ( वय 40) व, रा . वलसाड ( गुजरात ) , अनिल रामदास सोलंकी (वय -35 वर्षे ) रा . हाटमोहिदा ता . जि . नंदुरबार ह.मु. उधना ( गुजरात ) , हिरालाल सुभाष पवार (वय 35 वर्षे) रा . शहादा ता . शहादा यानाच मृत्यु झाला तर विशाल शरद पवार योगेश उर्फ अमृत नारायण सोनवणे रा . शहादा ता . शहादा यांना दुखापत झाली.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याप्रकरणी विशाल शरद पवार रा . प्लॉट नं . 1 शिरुड चौफुली , शांतीनगर शहादा ता . शहादा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्राला चालकाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात भादवी कलम 304 ( 3I ),279,337, 338,427 , मो वा . का . क . 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोना अंकुश गावित करीत आहेत.