नंदुरबार | प्रतिनिधी
विसरवाडी ते खांडबारा दरम्यान मोटरसायकल घसरून दोन जाणं ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजु लखा चव्हाण हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल (क्र.एम.एच.३९- ए.के.४६४४) हिच्याने विसरवाडीकडून खांडबार्याकडे भरधाव वेगाने जात असतांना खातगांव गावाच्या फाट्याजवळ मोटरसायकल घसरली. या अपघातात राजु लखा चव्हाण ( ४२, रा.उमर्दे बु.पोष्ट सुंदर्दे ता.नंदुरबार), अजमल रामजी पवार (३८ रा.राजापुर गुजरभवाली ता.नंदुरबार) यांचा डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भमराज भिका चव्हाण (रा.उमर्दे बु. ता.नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात मयत राजु लखा चव्हाण याच्या विरूध्द भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटरवाहन अधी १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ नरेंद्र वळवी करीत आहेत.