नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यात अवैध गौण खनिज वाहतूकीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी दि . १६ मार्च २०२२ पूर्वी जीपीएस बसविणे व महाखनिज प्रणालीसोबत संलग्न करणे बंधनकारक आहे.असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, परराज्यातून आणलेल्या वाळूचा साठा व निर्गतीबाबत कार्यपध्दती निश्चित करण्यात आलेली आहे . त्या अनुषंगाने परराज्यातून वाळू / रेती वाहतूकीबाबत “ महाखनिज ” या ऑनलाईन प्रणालीव्दारे प्राप्त अर्जदारांना परवाने निर्गमित करण्यात येत होते . मात्र महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यामध्ये सदर गुजरात राज्याच्या वाहतूक परवान्याचा व e – TP चा गैरवापर होत असल्याचे निर्दशनास आलेले आहे . त्यामुळे वाळू / रेती लिज धारक व वाळू / रेती साठा व विक्री परवानाधारक यांना सद्यास्थितीला – TP परवाने निर्गमित करण्यात येत आहेत . तसेच अवैध गौण खनिज वाहतूकीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी जीपीएस. बसविणे व महाखनिज प्रणालीसोबत संलग्न करणे अनिवार्य केलेले आहे . परराज्यातील वाळू / रेती वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांवर वाहन मालकांनी दि . १६ मार्च २०२२ पूर्वी वर नमुद केल्याप्रमाणे GPS Device बसविने अनिवार्य आहे . याशिवाय Geo Fencing कार्यवाही करण्यात येत आहे असे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.