साक्री l प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील चिपलीपाडा येथे भिलीस्थान लायन सेनेचे प्रदेश अध्यक्ष तथा भारतीय किसान सनेचे प्रदेश महासचिव पंडीतभाऊ तडवी यांच्या अध्यक्षतेखाली फलक अनावरण करण्यात आले.
यावेळी मान्यवरांच्या आगमना नंतर चिपलीपाडा गावातुन ,आदीवासी नृत्याने वाजत गाजत जल्लोषात मिरवणुकीने स्वागत करण्यात आले,मिरवणुकीत ,प्रदेशअध्यक्ष पंडीतभाऊ तडवी, जैताणे गटातील ,जि.पं.सदस्य मा.डॉ. नितिन सुर्यवंशी, नंदूरबार जिल्हा अध्यक्ष उदेसिंग पाडवी. (भिलीस्थान लायन सेना), कांतिलाल जाधव. नंदूरबार जिल्हाअध्यक्ष(विमुक्त भटके सेल), पत्रकार दिपक जाधव. धुळे जिल्हाअध्यक्ष भिलिस्थान लायन सेना रवि मोरे,पो.पा.श्रीयुत, कोकणी, निजामपूर ग्रां.पं.सदस्य सुनिल बागले,शांतिलाल न्याहळदे,तसेच ज्येष्ठ नागरीक शामराव कुवर व ग्रामस्थ महिला मंडळ,समाज बांधव ,यांच्या प्रमुख उपस्थीत वाजत गाजत मिरवणुक पार पडली.यावेळी विरपुरूष एकलव्य प्रतिमा पुजन करून भिलीस्थान लायन सेनेचे फलक अनावरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ. नितिन सूर्यवंशी म्हणाले की,मी सदैव समाजासाठी समाजाच्या पाठीशी उभा राहिल ,सुखात असो की दुःखात असो असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगतावर बोलतांना पंडीत तडवी यांनी सर्वप्रथम महापुरूषांना वंदन करत म्हणाले की,तुमच्या कुठल्याही कामात मी नेहमी आपल्या पाठीशी ऊभा आहे माझा समाज खुप अशिक्षित असुन त्या समाजाला चांगल्या प्रवाहात आणण्यासाठी मी सदैव प्रयत्नशिल राहीन. शिकाल तरच पुढे टिकाल याचे स्मरण करून विरपुरूष एकलव्यांनी विध्येसाठी तर चक्क गुरू दक्षिणा म्हणुन गुरूंना आपला अंगठा दिला म्हणून माझ्या समाज बांधवांनी आपल्या विरपुरूष एकलव्यांचे धडे घेतले पाहीजेत.आणि तरूण पिढीने एक आदर्श घडविला पाहिजे, समाजाचे नाव पुढे करुन चांगला समाज घडवत, समाज एकत्रीकरणातून एक नवी दिशा ,नवी आशा निर्माण करायला हवी असे यावेळी श्री.तडवी यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी तेसाठी धुळे जिल्हा अध्यक्ष रवि मोरे, केवबा वाघ,बजरंग सोनवणे,बारकु वाघ,दिनेश माळचे,भास्कर गायकवाड ,सुरेश माळचे ,योगेश देवरे , वासखेडीचे महेंद्र भवरे, तसेच ग्रामस्थ व परीसरातील समाज बांधव यांनी परिश्रम केले.