Public
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public
No Result
View All Result

रनाळा प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडीतील पदांसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Mahesh Patil by Mahesh Patil
July 28, 2021
in शैक्षणिक
0
नंदुरबार ! प्रतिनिधी
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प रनाळा अंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी रिक्त असलेल्या जागासाठी संबंधित गावातील इच्छुक व पात्र महिला उमेदवारांकडून 11 ऑगस्ट 2021 पर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना रनाळा येथे अर्ज मागविण्यात आले आहेत.
जुने मोहिदा, हाट मोहिदा येथील अंगणवाडी केंद्रातील  अंगणवाडी सेविका 2 रिक्त पदासाठी तसेच ढंढाणे, न्याहली, बह्याणे, सातुर्खे, निंभेल, अक्राळे, तिलाली, सैताणे, कठोरे दिंगर, कोळदा क्रमांक 3, कोळदा क्रमांक 6, अमळथे, भादवड-1, कलमाडी-1 अंगणवाडी केंद्रातील मदतनीसाच्या 14 रिक्तपदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी  केवळ त्या गावातील  महिला स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय 30 जून 2021 रोजी 21 वर्ष पूर्ण ते 32 वर्षांच्या दरम्यान असावे. अर्जदारास 2 अपत्याचे वर अपत्य नसावे. अंगणवाडी सेविकेसाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण ते उच्चत्तम तर मदतनीस पदासाठी सातवी उत्तीर्ण ते उच्चत्तम अशी आहे.
अर्जदार विधवा असल्यास गट विकास अधिकारी अथवा तहसिलदार यांचा दाखला जोडावा. विधवा व अनाथ उमेदवारास अतिरिक्त 10 गुण देण्यात येतील. सक्षम प्राधिकाऱ्याने वितरीत केलेला जातीचा दाखला, मागासवर्गीय उमेदवारास एससी व एसटी साठी 10 गुण तर व्ही.जे.एन.टी,ओबीसी, एस.बी.सी साठी 5 अतिरिक्त गुण देण्यात येतील. बारावी नंतर अर्जदार पदवीधर, डिएड, बीएड केले असल्यास अतिरिक्त 5 गुण देण्यात येतील. अंगणवाडी सेविका व मदतनीस कामाचा दोन वर्ष व त्यापेक्षा जास्त कालावधीचा अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्याचा दाखला जोडावा. रिक्त पदांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्यास बदलाबाबत वा भरतीप्रक्रिया स्थगित करण्याबाबतचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद नंदुरबार यांचे वतीने बालविकास प्रकल्प अधिकारी, रनाळा यांना राहील. शैक्षणिक पात्रतेसंबंधी व अर्जासोबत जोडलेले सर्व प्रमाणपत्र साक्षांकित केलेले असावे.
विहीत नमुन्यातील अर्ज आणि इतर माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना, रनाळा येथे संपर्क साधावा असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी संजय कोंडार यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी शिबिराचे आयोजन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र प्रवेशासाठी मुदतवाढ

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्र प्रवेशासाठी मुदतवाढ

June 27, 2022
जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

June 27, 2022
शिवसेनेचे बंडखोर पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

शिवसेनेचे बंडखोर पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

June 27, 2022
नवापूर येथे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे निषेध मोर्चा

नवापूर येथे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे निषेध मोर्चा

June 27, 2022
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

वीज कंपनीच्या महिला वरिष्ठ तंत्रज्ञास मारहाण

June 27, 2022
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

असा असेल तुमचा आजचा दिवस : 27 जून राशिभविष्य

June 27, 2022

एकूण वाचक

  • 1,667,895 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group