नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील मांडवी गावातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज भारतीय जनता पार्टी कार्यालय “विजय पर्व” नंदुरबार येथे प्रवेश केला.
पालकमंत्री असलेले ॲड. के.सी.पाडवी यांच्या विधानसभा मतदारसंघातील मांडवी या गावातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रवेश करणे केला. आगामी काळात मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले.याप्रसंगी राहुल पावरा,मानसिंग पावरा, कल्पेश पावरा,सागर पावरा,गुलाब वळवी, किशोर पावरा,मनोज पावरा,राहुल पावरा आदींनी प्रवेश केला.








