म्हसावद l प्रतिनिधी
येथील सन्मित्र क्रीडा मंडळ आणि अटल बिहारी वाजपेयी वाचनालयातर्फे सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमीत्ताने यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी दोन्ही मंडळाच्या अध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी, उपाध्यक्ष शिवपाल जांगिड, पिनाकिन पटेल, के. के. सोनार,प्रा संपत कोठारी,सुरेश चव्हाण, प्रशांत कदम, प्रकाश शेळके,अरूण राठोड, समता परिषदेचे राजेंद्र वाघ,सावता फाऊंडेशनचे राजेंद्र माळी, रमाशंकर माळी, हिरालाल माळी, आदी उपस्थित होते, उपस्थितांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.