नंदुरबार ! प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच स्मित हॉस्पीटल येथे गुडघ्याची सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी ठरली. नंदुरबार शहरातील स्वामी समर्थ नगर येथील अरविंद पटेल (वय ७१) यांची ही शस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्ह्यातील पहिलीच सांधेरोपण शस्त्रक्रिया स्मित हॉस्पीटलमध्ये यशस्वी ठरली आहे.
नंदुरबार शहरातील पहिलेच १०० खाटांचे अत्याधुनिक मल्टीस्पेशलिटीज स्मित हॉस्पीटल येथे विविध सुपर स्पेशलिटी उपचार व शस्त्रक्रिया उपलब्ध असून अल्पावधीतच जिल्ह्यातील नागरीकांनी या हॉस्पीटलमध्ये विविध उपचारांचा लाभ घेतला आहे. सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी विशेष मॉड्युलर ऑपरेशन थिएटर सर्व मानकांसह व नाशिक, सुरत आदी मोठ्या शहरांच्या धर्तीवर उपलब्ध आहे. सुरत येथील प्रसिद्ध सांधेरापण तज्ञ डॉ.केविन चोक्सी, नंदुरबार येथील प्रसिद्ध अस्थिरोग विशारद डॉ.त्र्यंबक पटेल, डॉ.जयवंत पटेल, भूलतज्ञ डॉ.जयेश जैन यांनी ही शस्त्रक्रिया पार पाडली. आता फिजिशियन डॉ.गौरव तांबोळी यांच्या देखरेखीखाली रुग्ण आहे. अस्थिरोग विभागातील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया स्मित हॉस्पीटल येथे कायमस्वरुपी होत असून सांधेरोपणासोबतच जिल्ह्यात प्रथमच ऑर्थोस्कॉपी शस्त्रक्रियाही पार पडली. सदर शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत उपलब्ध आहे. तसेच सर्व शस्त्रक्रिया कॅशलेस असून सर्वच इन्शुरन्स कंपनीचे कॅशलेस उपलब्ध आहेत. स्मित हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्य तीन ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहे.