Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतात ट्रॅक्टर चालविल्याचे रागातुन चुलत काकाचा खुन करणाऱ्या पुतण्यास न्यायालयाने जन्मठेप शिक्षेसह इतर तीन आरोपीतांना ठोठावला

team by team
March 10, 2022
in क्राईम
0
महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

नंदूरबार l प्रतिनिधी
नवापुर पोलीस स्टेशन हद्यीत पांघराण डाबरी ता . नवापुर येथे शेतात ट्रॅक्टर का चालवुन नेले म्हणुन चुलत काकाचा खुन करणाऱ्या आरोपीस नंदुरबार सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व इतर ३ आरोपीतांना २ महिने कारावास व प्रत्येकी रुपये ५०० दंडाची शिक्षा ठोठावली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, घटना दि. १७ मार्च २०२० रोजी सकाळी ३.३० वाजेचे सुमारास नवापुर पोलीस स्टेशन हद्यीत पांघराण डाबरी ता . नवापुर जि . नंदुरबार येथे मयताचे घरात घडली होती . फिर्यादी रविना गावीत रा . पांघराण डाबरी ता . नवापुर जि . नंदुरबार यांचे वडील राजु महादु गावीत व आरोपी यांची आजुबाजुला शेती असुन दोन्ही शेतांचा बांध एकच असुन दोन्ही शेतांचा येण्याजाण्याचा रस्ता हा वेगळा आहे . दि . १७ मार्च २०२० रोजी फिर्यादी रविना गावीत ही तिचे आईवडीलांसह शेतात काम करीत असतांना रविनाचे वडील राजु महादु गावीत यांनी शेतात रोटर करण्यासाठी भाडयाने ट्रॅक्टर मागविले होते . सदर ट्रॅक्टर आरोपी चुलतकाक अमृत धनजी गावीत यांच्या शेतातुन फिर्यादीचे शेतात आले होते . नंतर फिर्यादीचे शेतातील काम दुपारी २ वाजता पुर्ण होवुन आलेल्या मार्गानेच ट्रॅक्टर परत गेले होते . फिर्यादीचे चुलत काका आरोपी अमृत धनजी गावीत हे व त्यांचा लहान मुलगा आरोपी विपुल अमृत गावीत यांनी आमचे शेतातुन ट्रॅक्टर का चालवत आणले या गोष्टीचा राग मनात ठेवुन फिर्यादीचे वडील राजु महादु गावीत यांच्या सोबत फिर्यादी रविना हिच्या समोरच भांडण केले होते . त्यानंतर दुपारी ३.३० वाजता फिर्यादी ही आईवडील व भावंडांसह घरी असतांना चुलत काका अमृत धनजी गावीत , विपुल अमृत गावीत , कल्पेश अमृत गावीत , मुलगी कल्पना वसावा असे फिर्यादीचे घरी आले व वडील राजु महादु गावीत व आई यशोदाबाई यांना अश्लील शिवीगाळ करुन घरातून बाहेर येण्यास सांगत होते . फिर्यादी रविना व तिचे आईवडील असे सर्व घाबरल्याने घरातुन कोणीही बाहेर येत नव्हते . तेव्हा आरोपी अमृत धनजी गावीत , विपुल अमृत गावीत , कल्पेश अमृत गावीत , त्यांची मुलगी कल्पना वसावा यांनी बाहेर असलेले कुडमातीचे कंपांऊड तोडायला सुरुवात केली होती . तेव्हा फिर्यादी रविना , तिची बहीण अंकीता व भाऊ कृष्णा असे घराबाहेर आले होते . तेव्हा वरील सर्व आरोपीतांनी त्यांचे हातातील लाकडी डेंगारा , काठीव्दारे फिर्यादी रविना हिच्या घराची तोडफोड करायला सुरुवात केली होती . कल्पेश अमृत गावीत याने फिर्यादी रविना हिचे पाठीवर लाकडी डेंगायाने मारहाण करण्यास सुरुवात केली होती . तेव्हा अंकीता हिने कल्पेशच्या तावडीतून सोडवत असतांना तिला देखील कल्पेश याने मारहाण केली होती.त्यामुळे तिच्या डाव्या हाताला मार लागला होता . त्यामुळे घरातुन
फिर्यादी हिचे वडील राजु गावीत व आई यशोदाबाई हे घरातुन आरोपीतांच्या तावडीतुन मुलींना सोडायला बाहेर आले . तेव्हा लगेचच आरोपी कल्पेश अमृत गावीत याने त्याचे हातातील डेंगाऱ्याने फिर्यादी हिचे वडील राजु महादु गावीत यांच्या डोक्याला मारले होते . त्यात राजु गावीत यांच्या डोक्यास मार लागल्याने त्यांना जखम होवुन डोक्यातून रक्तस्त्राव होवु लागला होता . त्यामुळे राजु गावीत हे डोक्याला मार लागल्याने जागीच बेशुध्द पडले होते . तेव्हा आरोपीतांचे व फिर्यादी यांचे भांडण गावातील काही नागरीकांनी सोडवत आरोपीतांचे तावडीतुन फिर्यादी व तिचे भावंड व वडील यांना सोडवले होते . फिर्यादी रविना हिचे वडील राजु महादु गावीत यांना डोक्याला मार लागल्याने डोक्यातुन रक्त निघत असल्यामुळे त्यांना गावातीलच रिक्षाव्दारे औषोधपचारकामी नवापुर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी राजु महादु गावीत यांना तपासुन मयत झालेबाबत सांगितले होते . फिर्यादी रविना हिने चुलत काका अमृत धनजी गावीत व त्यांची मुले विपुल अमृत गावीत , कल्पेश अमृत गावीत , त्यांची मुलगी कल्पना वसावा यांनी शेतातील झालेल्या भांडणावरुन राग मनात ठेवुन फिर्यादी व तिचे आईवडील , भाऊबहीण अश्यासोबत भांडण करुन फिर्यादी रविना हिचे वडील राजु महादु गावीत यांना जिवेठार मारले म्हणुन फिर्यादीच्या तक्रारीवरुन वर नमुद घटनेचा गुन्हा नवापुर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता . सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास नवापुर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक व्ही . एच . राजपुत यांनी करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते .सदर खटल्याची सुनावणी अति . जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदुरबार आशुतोष भागवत यांच्या कोर्टात होवुन आरोपी अमृत धनजी गावीत , विपुल अमृत गावीत , कल्पेश अमृत गावीत,कल्पना जीवन वसावा यांच्या विरुध्द गुन्हा शाबीत झाल्याने न्यायालयाने आरोपी कल्पेश अमृत गावीत यास भा.द.वि.क. ३०२ अन्वये जन्मठेप व रुपये १ हजार दंड तसेच अमृत धनजी गावीत ,विपुल अमृत गावीत , कल्पना जीवन वसावा सर्व रा . पांघरण ता . नवापुर जि . नंदुरबार यांना भादविक ५०४ अन्वये २ महिने साधा कारावास व प्रत्येकी रुपये ५०० रुपये दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे सरकारी वकील ॲड.विजय सी . चव्हाण यांनी पाहीले असुन खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकॉ नितीन साबळे व पोना गिरीष पाटील यांनी कामकाज केले आहे . तपास अधिकारी व त्यांचे पथक तसेच सरकारी वकील यांचे पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी हार्दीक अभिनंदन केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

तोरणमाळ फलाई येथे ११ मार्च रोजी भोंगऱ्या बाजाराचे आयोजन,पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहण्याचे सिताराम पावरा यांचे आवाहन

Next Post

थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ परिसरात बेमोसमी पावसाची हजेरी

Next Post
थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ परिसरात बेमोसमी पावसाची हजेरी

थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ परिसरात बेमोसमी पावसाची हजेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add