नंदुरबार l प्रतिनिधी
रोलबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन व नंदुरबार जिल्हा रोलबॉल असोसिएशन यांच्यावतीने दुसर्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन हि.गो.श्रॉफ हायस्कूल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत भारतातील सात राज्यांचे संघ सहभागी झाले होते या स्पर्धेचे बक्षीस वितरण क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी रोल बॉल खेळाचे जनक राजू दाभाडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला या राष्ट्रीय स्पर्धेत मुलांमध्ये राजस्थान तर मुलींमध्ये महाराष्ट्राने विजेतेपद पटकाविले तर मुलांमध्ये उपविजयी महाराष्ट्र तर मुलींमध्ये रोलर स्पोर्ट्स सोशल ॲकॅडमी पुणे तृतीय क्रमांकावर मुलांमध्ये मध्य प्रदेश मुलींमध्ये गुजरात या विजयी खेळाडूंना मान्यवरांच्या उपस्थितीत मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र रोलबॉलचे सचिव प्रताप पगार, विभागीय क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, श्रॉफ हायस्कूल चे उपमुख्याध्यापक राजेश शहा, गुजरात सचिव धर्मेश परमार, मध्यप्रदेश सचिव सुर्यदत्त जोशी, रोलर स्पोर्ट्स सोशल अकॅडमी सचिव महेश उभे, टेनिक्वाईट संघटनेचे उपाध्यक्ष श्रीराम मोडक, पोलीस दलाचे क्रीडा प्रमुख योगेश सोनवणे,आबाजी सपोर्टचे उपाध्यक्ष जितेंद्र पगारे, खो खो चे राष्ट्रीय पंच अनिल रौंदळ, जयेश वाणी, जिल्हा रोलबॉल संघटनेचे सचिव नंदू पाटील,दिनेश बैसाणे, बी.डी जाधव, क्रीडाशिक्षक जगदीश वंजारी, क्रीडाशिक्षक भिकू त्रिवेदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमात नंदुरबार जिल्हा संघटनेचे साची शिरसाट, वंश त्रिवेदी, ओम चौरे, प्रिया देसाई, हर्षल वळवी या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. स्पर्धा यशस्वितेसाठी संयोजन समितीचे भिकू त्रिवेदी, नंदू पाटील, जगदीश पाटील, जगदीश वंजारी, डॉ.मयूर ठाकरे, दिनेश ओझा,दिनेश बैसणे, जितेंद्र माळी, राजेश्वर चौधरी, सीमा पाटील, भरत चौधरी, सचिन सूर्यवंशी,रामा हाटकर,प्रतिक जैन आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.मयुर ठाकरे तर आभार भिकू त्रिवेदी यांनी मानले.