नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार पालिकेने घरपट्टी व पाणी पट्टी माफीची मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली होती.त्याला मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी एका पत्रकाद्वारे उत्तर दिले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, सन्मानीय वीजु भाऊ जिल्हाध्यक्ष, भाजपा नंदुरबार आपण नंदुरबार नगर परिषदेकडे घरपट्टी व पाणी पट्टी माफीची मागणी केली. मी आपणास सांगु इच्छितो कि, महाराष्ट्रात अशा पद्धतीने कुठल्याही नगरपरिषद अथवा महानगर पालीकेने अशा पद्धतीने घरपट्टी आणि पाणी पट्टी माफी दिली असेल तर आपण त्याचे नाव आम्हाला कळवावे.. जर अशी एकही नगरपरिषद अथवा महापालीका असेल तर आपण दोघेही त्या शहराला भेट देवुन त्यांनी ज्या पद्धतीने घरपट्टी आणि पाणी पट्टी माफी केली त्याचा अभ्यास करुन ती योजना कार्यन्वीत करण्याचा प्रयत्न करु , अन्यथा अशा प्रकारची खोटी पत्रकबाजी करुन नंदुरबार करांची दिशाभुल थांबवावी.असे प्रतिपादन मा. आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.








