Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खबरदार नंदूरबार शहरात सक्तीची वसुली कराल तर :भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

team by team
February 28, 2022
in राजकीय
0
जिल्ह्यात भाजपातर्फे आज अंडरवर्ल्ड डॉनच्या करण्यात येणार पुतळा दहन : जिल्हाध्यक्ष विजय चौधरी

नंदुरबार l प्रतिनिधी
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे नंदुरबार शहरातील जनता आर्थिक संकटाचा सामना करीत आहे.कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी सर्वसामान्य नागरिकांची,व्यापाऱ्यांची आर्थिक घडी सुरळीत न झाल्याने नागरिकांकडून घरपट्टी वसूल न करता ती पूर्णतःमाफ करावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,ज्यांचा नगरपालिकेच्या प्रशासनाशी,कारभाराशी काडीमात्र संबंध नसताना व जे व्यक्ती पालिकेचे कुठलेही पदाधिकारी नसतांना नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन घरपट्टीचे आदेश कसे देऊ शकतात ? मुळातच तहसीलदार तथा नगरपालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी भाऊसाहेब थोरात हे अनधिकृत,घटनाबाह्य नियमबाह्य बैठकीला उपस्थित राहून या चंद्रकांत रघुवंशी यांच्या आदेशाची अंमलबजावणी कशी करू शकतात?असा सवाल करून भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी म्हटले आहे की,”खबरदार सक्तीची वसुली कराल तर, तोंडावर पडाल !”
एकीकडे नंदुरबार शहरात नागरी सुविधांचा प्रचंड अभाव आहे.असे असतांना सक्तीची वसुली कशी करू शकतात?शहरात सर्वत्र भूमिगत गटारींची वाट लागली,सगळीकडे रस्त्याची दयनीय अवस्था झाली,ठिकाणी केरकचरा आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले, मोकाट गुरांचा सुळसुळाट आहे, साफसफाई व स्वच्छतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खोटी बिले काढली जात आहे, भूमिगत गटारीचे पाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी माजली आहे व त्यामुळे डास व मच्छरांचा उपद्रव वाढला आहे.नंदुरबार शहरात ठिकठिकाणी कॉलन्यांमध्ये बाग- बगीच्यांसाठी करोडो रुपये लावले व खर्चही केले,मात्र ते बाग-बगीचे कुठे आहेत?असे एक नव्हे अनेक मुद्दयांचा ढिग असताना कुठल्या तोंडाने तुम्ही घरपट्टी वसूल करणार आहात ? “हिम्मत असेल तर नळ कनेक्शन तोडून दाखवा जनता जनार्दन तुम्हाला तुमची औकात दाखवल्याशिवाय राहणार नाही” असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी दिला आहे. प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे की,चंद्रकांत रघुवंशी हे नगरपालिकेच्या कुठल्याही घटनात्मक पदावर नसताना त्यांच्या उपस्थितीत तहसीलदार व प्रभारी मुख्याधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी बैठक घेतल्याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी,अशी मागणी देखील भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जि.प. मध्ये तब्बल 22 वर्षानंतर जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव

Next Post

खोटी पत्रकबाजी करुन नंदुरबार करांची दिशाभुल थांबवावी : मा.आ. चंद्रकांत रघुवंशी

Next Post
खोटी पत्रकबाजी करुन नंदुरबार करांची दिशाभुल थांबवावी : मा.आ. चंद्रकांत रघुवंशी

खोटी पत्रकबाजी करुन नंदुरबार करांची दिशाभुल थांबवावी : मा.आ. चंद्रकांत रघुवंशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add