नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत आयोजित जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव 2022 उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व शिक्षण व आरोग्य सभापती अजित नाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षा ॲड. सिमा वळवी उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेमार्फत तब्बल 22 वर्षानंतर जिल्हा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात 26 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. तर दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड. सिमा वळवी ,शिक्षण आरोग्य सभापती अजित नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर आदींसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते
सांस्कृतिक कार्यक्रमात तालुकास्तरावरील व जिल्हा स्तरावरील 40 कर्मचाऱ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यात एकपात्री नाटक, समूह गीत व नृत्य, कवितावाचन, गीत गायन आदी कार्यक्रम संपन्न झाले. यात मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्वतः एक ममीक विनोद सादर करून कार्यक्रमात उत्साह वाढविला.
यानंतर क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , सभापती अभिजित नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, राजेंद्र पाटील कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी क्रीडा स्पर्धेत 100 मीटर व 400 मीटर धावणे- प्रथम -बबीता पाडवी, द्वितीय – मंगला वळवी, तृतीय- धनश्री जाधव, गोळा फेक- प्रथम- डॉ. वर्षा फडोळ, द्वितीय -कविता शिंदे , तृतीय धनश्री जाधव, लांब उडी- प्रथम संगीता नरवाडे तळोदा ,द्वितीय बबीता पाडवी नंदुरबार,तृतीय संगीता जाधव तळोदा, बुद्धिबळ स्पर्धेत- मनीषा अहिरराव नंदुरबार,द्वितीय – कविता शिंदे शहादा, तृतीय- संगीता जाधव तळोदा ,बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम – संगीता जाधव ,द्वितीय मोनिका सोनार ,तर क्रिकेट स्पर्धेत डॉ. वर्षा फडोळ यांच्या नेतृत्वाखाली विजेता संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
वैयक्तिक पुरुष गटात 100 मीटर धावणे प्रथम- राकेश कोकणी नवापुर, द्वितीय विवेकानंद चव्हाण नंदुरबार, तृतीय- शरद गावित नवापूर, 400 मीटर धावणे प्रथम- राकेश कोकणी नवापूर, द्वितीय- परमेश्वर कल्याण नवापूर तृतीय -विवेक चव्हाण, 800 मीटर धावणे प्रथम- भारत ठाकरे शहादा,द्वितीय- महेंद्र बैसाणे शहादा, तृतीय-भोळाराम वळवी नवापूर ,गोळा फेक प्रथम- राकेश कोकणी नवापूर, द्वितीय-रुपेशकुमार नागलगावे ,तृतीय लिलेश्वर खैरणार ,लांब उडी -प्रथम -किसान पवारा द्वितीय -शरद गावीत तृतीय -राकेश कोंकणी बॅडमिंटन प्रथम – डॉ. योगेश्वर पाटील ,द्वितिय प्रशांत वाघ ,तृतीय -निलेश सोनवणे, खो-खो स्पर्धेत प्रथम -धडगाव पंचायत समिती, द्वितीय- शहादा पंचायत समिती तर तृतीय- नवापूर पंचायत समिती ,कबड्डी -प्रथम- तळोदा पंचायत समिती, द्वितीय -धडगाव पंचायत समिती, तृतीय- नवापूर पंचायत समिती तर क्रिकेटमध्ये विजेता- शहादा पंचायत समिती संघ ,उपविजेता- नवापूर पंचायत समिती संघांना प्रमाणपत्र व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. सांस्कृतीक महोत्सवाचे सूत्रसंचालन किरण दाभाडे व जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील पाटील यांनी केले. तर क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ,प्रशासन अधिकारी सुभाष मारणार,नितीन खंडेराय, गौतम शिरसाठ,तापसिंग पाडवी, राहुल भोये,सुनील पाटील, दिलीप जाधव आदिनी परिश्रम घेतले.








