नंदुरबार | प्रतिनिधी
तळोदा शहरातील खाज्या नाईक चौकातील महिला हया मलकवाडयामागील गटसंधान केंद्राचे बाजुला मोकळ्या जागेत नैसर्गिक विधी करीत असतांना त्यांना भिंतीआड लपून पाहणारा आरोपी दिनेश शांताराम चौधरी यास न्यायालयाने १ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे .
याबाबत अधिक महिती अशी कि, फिर्यादी चौक तळोदा यांच्या पत्नी तसेच खाज्या नाईक चौकातील इतर महिला हया मलकवाडयामागील गटसंधान केंद्राचे बाजुला मोकळ्या जागेत नैसर्गिक विधीला जातात . सुमारे ७ ते ८ दिवसांपासून सदर ठिकाणी सकाळी सकाळी एक इसम मितीच्या आडोश्याला लपुन उभा राहून नैसर्गिक विधीला येणार्या बायांना लपुन पाहत असतो असे फिर्यादी यांना समजले होते . दि. २५ एप्रिल २०१३ रोजी सकाळी ७ वाजता फिर्यादी यांच्या पत्नी व खाज्या नाईक चौकातील इतर महिला मलकवाडयामागील गटसंधान केंद्राचे बाजुला मोकळया जागेत नैसर्गिक विधी करीता गेल्या त्यावेळेस कोण इसम वायांना भिंतीआडुन पाहतो म्हणून फिर्यादी हे खात्री करण्याकरीता सुभाष टॉकीजचे शॉपींगसेटर मागे आडोश्याला उभे होते . त्यावेळी एक इसम मितीच्या आडोश्याला उभा राहुन महिला नैसर्गिक विधी करीत असतांना पाहत होता त्याच वेळी यांनी सदर इसमास त्याचे जवळ गुपचुप जवळ जावुन हटकले असता व त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिनेश शांताराम चौधरी रा . तळोदा असे सांगितले होते व त्याला तु भिंतीआडु महिलांना का पाहतो ? असे विचारल्यावर तो तेथुन पळून गेला होता , दि . २५/०४/२०१३ रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास तळोदा गावातील खाज्या नाईक चौकातील महिला हया गटसंधान केंद्राचे बाजुला मोकळ्या जागेत नैसर्गिक विधी करीता बसल्या असतांना त्यांना भिंतीआड लपून पाहणारा आरोपी दिनेश शांताराम चौधरी रा . तळोदा हा स्त्रियांना लज्जा बाटेल असे कृत्य करतांना मिळून आला म्हणून फिर्याद दिली होती . सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास पोहेकॉ आनंदा पाटील यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात मुदतीत दोषारोपपत्र सादर केले होते . सदर खटल्याची सुनावणी जे.एम.एफ.सी. न्यायाधीश एस.डी.हरगुडे , तळोदा यांच्या कोर्टात होवुन आरोपी दिनेश शांताराम चौधरी रा . तळोदा यांच्या विरुध्द भा.द.वि.क. ३५४ अ व ३५४ क अन्वये गुन्हा शावीत झाल्याने न्यायालयाने सदर आरोपीस १ वर्ष कारावास व रुपये २ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड . श्रीमती एस.व्ही.वसावे यांनी पाहीले असुन खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकों देवि वाडीले यांनी कामकाज केले आहे .








