म्हसावद l प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहादा शहर राष्ट्रवादी व शहादा तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचा वतीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या सूचनेनुसार शहादा येथील एस टी आगारातील कर्मचाऱ्यांना संवेदना किट ( किराणा ) वाटत करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर, राष्ट्रवादीचे शहादा तालुका अध्यक्ष माधवराव पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र वाघ, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संजय खंडारे,महिला आघाडीचा जिल्हा सरचिटणीस अलकाताई जोंधळे, महिला आघाडीचा तालुका अध्यक्ष रेश्माताई पवार, जेष्ठ कार्यकर्ते प्रतापभाई चव्हाण सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस साहेबराव बिरारे,सामाजिक न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गुलाले, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष, छोटू कुवर युवक जिल्हा सरचिटणीस जगदीश माळी, तालुका अध्यक्ष महेंद्र कुवर, युवक शहर अध्यक्ष इकबाल शेख, राष्ट्रवादी आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष पराडके, युवक शहर कार्याध्यक्ष शुभम कुवर, तुषार सामुद्रे, विष्णू भगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी एस टी कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.