Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पिक विमा रक्कम त्वरित मिळावी,भालेर परिसरातील शेतकर्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

team by team
February 16, 2022
in कृषी
0
पिक विमा रक्कम त्वरित मिळावी,भालेर परिसरातील शेतकर्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

नंदुरबार | प्रतिनिधी

दुष्काळी परिस्थितीत मदत मिळणेबाबत व पिक विमा रक्कम त्वरित मिळावा या मागणीचे निवेदन नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शेतकर्‍यांनी पालकमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी मनिषा खत्री , नंदुरबार तहसीलदार यांना दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी नंदुरबार तालुक्यातील भालेर व परिसरात खरीप हंगाम जवळ जवळ वाया गेला असून पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती असून नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात आमच्या माहितीनुसार सरासरी ४० पैसे आणेवारी लागली असून खरीप हंगामातील उत्पन्नाच्या आधारे शेतकर्‍याचे भांडवल सुद्धा निघालेले नाही . रब्बी हंगाम तर येणारच नाही . तसेच नंदुरबार तालुक्यातही रोजगार मिळेल असे उद्योगधंदे नाहीत . त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून कोणतेही उत्पन्न नाही अशा बिकट परिस्थितीत दुष्काळ म्हणून शासनाकडून मदत मिळावी तसेच बहुतांश शेतकरी वर्गाने पिक विमा काढला असून रिलायन्स इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीने अल्पशः शेतकर्‍यांना पिक विमा दिलेला आहे . तरी आपल्या स्तरावरून पिक विमाबाबत कार्यवाही होऊन सर्व विमा धारक शेतकरी यांना पिक विमा लाभ मिळवून द्यावा . जेणेकरून दुष्काळी मदत व पिक विमा मिळून दुष्काळी परिस्थितीत शेतकरी वर्गास आर्थिक मदत मिळेल अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.निवेदनावर चंद्रशेखर भास्कर पाटील, पी.आर.बागुल,विजय जगन्नाथ पाटील,युवराज पाटील,यमुनाबाई युवराज पाटील, प्रभाकर गोविंद पाटील, साहेबराव दौलत पाटील, विनायक तोंगल पाटील,फकिरा गंगाराम पाटील, राजेंद्र गोविंदा पाटील, किशोर श्रावण पाटील आदींची स्वाक्षरी आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अटलबिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे संत रोहिदास व संत सेवालाल महाराज जयंती साजरी

Next Post

शहादा शहर व तालुका राष्ट्रवादीतर्फे एस टी आगारातील कर्मचाऱ्यांना संवेदना किट वाटप

Next Post
शहादा शहर व तालुका राष्ट्रवादीतर्फे एस टी आगारातील कर्मचाऱ्यांना संवेदना किट वाटप

शहादा शहर व तालुका राष्ट्रवादीतर्फे एस टी आगारातील कर्मचाऱ्यांना संवेदना किट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add