Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा येथील ऑक्सीजन प्लॅन्टचे उद्घाटन

team by team
February 14, 2022
in राजकीय
0
पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा येथील ऑक्सीजन प्लॅन्टचे उद्घाटन

नंदुरबार l प्रतिनिधी
जामिया मिलीया हॉस्पीटल, अक्कलकुवा येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, प्रताप पाडवी, मकराजी आरीफ, जामिया संकुलाचे अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी, उपाध्यक्ष हुसेफा गुलाब मोहम्मद वस्तानवी, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, तहसिलदार सचिन म्हस्के आदी उपस्थित होते.

यावेळी ॲड. पाडवी म्हणाले की, कोविड काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता होती. ती आपण सर्वांनी बघीतली त्यामुळे या ऑक्सिजन निर्मिती प्लॅटन्चा अक्कलकुवा तसेच धडगाव व मोलगी या भागातील जनतेला उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जामिया येथील शिक्षणाचे काम उत्कृष्ठ असून जामियाने मेडीकल कॉलेजसाठी प्रयत्न करावा, त्यासाठी शासनामार्फत मदत करण्यात येईल. तसेच अक्कलकुवा तालुक्यात विविध विकासकामे करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
जामियाचे उपाध्यक्ष वस्तानवी म्हणाले की, कोरोना बाधितांच्या उपचारासाठी आवश्यक ऑक्सिजनची पूर्तता नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लॅन्टमधून होणार आहे. Human Concern Internationl (HCL) Canada यांनी हा ऑक्सिजन प्रकल्प जामिया संस्थेस दिला असून प्रकल्प उभारण्यासाठी 45 लाख रुपये खर्च झाला आहे. हा ऑक्सिजन प्रकल्प हवेतून ऑक्सिजन निर्मिती (पीएसए) प्रकारातील असून प्रति मिनिट 150 एलपीएम ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता असलेला प्लॅन्टमधून एकावेळी 30 रुग्णांना ऑक्सिजन पुरविता येईल. या प्रकल्पामुळे कोरोनावरील उपचारासाठी आणि इतरही प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा स्थानिक पातळीवर करणे शक्य होणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक तसेच जामिया शिक्षण संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

रिपब्लीकन एम्पॉईज फेडरशनच्या नंदुरबार जिल्हा अध्यक्षपदी रत्नाकर पाटील यांची नियुक्ती

Next Post

पालकमंत्र्यांनी दिली देहली प्रकल्पास भेट, जाणून घेतल्या प्रकल्पग्रस्ताच्या समस्या

Next Post
पालकमंत्र्यांनी दिली देहली प्रकल्पास भेट, जाणून घेतल्या प्रकल्पग्रस्ताच्या समस्या

पालकमंत्र्यांनी दिली देहली प्रकल्पास भेट, जाणून घेतल्या प्रकल्पग्रस्ताच्या समस्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add