Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी पूर्ववत सुरू करावी

team by team
February 12, 2022
in शैक्षणिक
0
आदिवासी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी पूर्ववत सुरू करावी

तळोदा l प्रतिनिधी
आदिवासी जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी पूर्ववत सुरू होण्याबाबतचे निवेदन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे नाशिक विभागीय कार्यवाह डी. पी. महाले यांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगामध्ये मिळत होती. शासनाने १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन लागू केला आहे, मात्र मार्च २०१९ पासून त्याची कार्यवाही झाली, तेव्हापासून या आदिवासी जिल्ह्यातील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी शासनाने बंद केलेली आहे. ही वेतनश्रेणी शासनाने सातवा वेतन आयोगाप्रमाणे इतर विभागाप्रमाणे उदाहरणार्थ जिल्हा परिषद कर्मचारी, वनविभाग, आदिवासी विकास विभाग कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे एकस्तर वेतनश्रेणी लागू झालेली आहे. या धोरणानुसार नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी लागू व्हावी असे म्हटले आहे.
शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे ओएसडी विजय बोरसे नंदुरबार जिल्ह्याच्या प्रशासकीय दौऱ्यावर आले असताना त्यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा करून त्यांना सदर निवेदन देण्यात आले. यावेळी श्री. बोरसे यांनी लवकरच सदर विषयाबाबत राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांना सविस्तर माहिती देऊन सदर विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, नंदुरबार जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी. पी. महाले, जिल्हा कार्यवाह इसरार सय्यद, कोषाध्यक्ष जयेश वाणी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची पारितोषिक रचना जाहीर

Next Post

कृषी पंपाचे वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत द्यावी :भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add