Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची पारितोषिक रचना जाहीर

team by team
February 12, 2022
in राज्य
0
जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची पारितोषिक रचना जाहीर

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार येथे जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ही दि.२६ ते २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान संपन्न होणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना दिल्या जाणार्‍या पारितोषिकांची रचना आयोजन समितीतर्फे जाहीर करण्यात आली.
नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात गाडगेबाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे आयोजित राज्य पुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर तथा जिभाऊ यांच्या स्मरणार्थ जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा गेल्या १० वर्षांपासून आयोजित केली जात आहे. मागील वर्षी कोरोना या जागतिक महामारीच्या प्रादुर्भावामुळे सदर स्पर्धा स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सर्व निर्देशाचे पालन करीत दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२२ दरम्यान सदर जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत प्रथम येणार्‍या एकांकिकेस जिभाऊ करंडकसह ११ हजार रुपयाचा धनादेश व प्रशस्तीपत्र मिळतील. तसेच द्वितीय व तृतीय एकांकिकेस अनुक्रमे करंडकासह ७ हजार व ५ हजार रुपयांचा धनादेश व प्रशस्तीपत्रके मिळतील. उत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका, लक्षवेधी एकांकिका व उत्तेजनार्थ एकांकिकेसाठी प्रत्येकी २ हजार रुपये, करंडक व प्रशस्तीपत्रके मिळतील. सर्वोत्कृष्ट अभिनय पुरुष व स्त्री तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथमसाठी रोख २ हजार रुपये, द्वितीय १ हजार रुपये व तृतीय पाचशे रुपये रोखेसह स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येतील. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट संगीत, लेखन, नैपथ्य, प्रकाशयोजना यासाठी ही प्रत्येकी रोखे २ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रके देण्यात येतील. तसेच सहभागी संघांना देखील सहभागाची प्रशस्तीपत्रके देण्यात येतील, असे आयोजकांतर्फे जाहीर करण्यात आले.
या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी व महाविद्यालयांनी सहभागी होऊन नंदुरबार जिल्ह्यातील नाट्य चळवळीला चालना द्यावी, असे आवाहन आयोजक नागसेन पेंढारकर, मनोज सोनार, राजेश जाधव, आशिष खैरनार यांच्यासह तुषार ठाकरे, रवींद्र कुलकर्णी, राहुल खेडकर, पुरुषोत्तम विसपुते, सागर कदम, हर्षल महिरे आदींनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार पोलिसांनी संवेदनशीलता दाखवत आदिवासी महिलेला सुखरूप नातेवाईकांच्या केले स्वाधीन

Next Post

आदिवासी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणी पूर्ववत सुरू करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add