Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पोलीसांची अशीही माणुसकी: कोरोनाने मृत झालेल्या महिलेची सानुग्रह पळवलेली रक्कम पोलिस कर्मचाऱ्यांनी जमा करीत केली परत

team by team
February 4, 2022
in क्राईम
0
नंदुरबार पोलीसांची अशीही माणुसकी: कोरोनाने मृत झालेल्या महिलेची सानुग्रह पळवलेली रक्कम  पोलिस कर्मचाऱ्यांनी जमा करीत केली परत

नंदूरबार l प्रतिनिधी
कोरोना या महामारीने मृत्यू झालेल्या पत्नीचे अर्थसहाय्य बँक खात्यावर जमा झाले होते. ती पन्नास हजार रुपयांची रक्कम काढण्यासाठी मयत महिलेचा वृद्ध पती प्रकाशा येथील बँकेत गेला. त्या बँकेतून वृद्धाने ५० हजार रुपये काढले आणि नातवांसाठी एका हॉटेलवर खाऊ घेत असतानाच ५० हजार रुपयांची ती पिशवी चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना काल दि.२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.याबाबत माहिती मिळताच नंदूरबार पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी ५० हजाराची रक्कम जमा करत वृद्धाला मदत केल्याने पोलिसांनी माणुसकीच्या भावनेतून जमा केलेले पैसे स्विकारताना त्याला रडू कोसळले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पदम हारचंद कोळी वय वर्षे ७५ वर्षे रा.डामरखेडा ता.शहादा.घरी अठराविश्व दारिद्र्य, संजय गांधी निराधार योजनेच्या मदतीवर अवलंबून असलेले जगणे. त्यातच पत्नीस कोरोना झाला.तिच्या कोरोनाच्या उपचाराच्या खर्चामुळे हवालदील झालेला प्रपंच. या साऱ्यामुळे संसाराचा गाडा मोडकळीस आलेला. पत्नी कोरोनातून बाहेर आली नाही.गतवर्षी ती साथ सोडून निघून गेली.वृद्धापकाळात त्याचे जगणे आणखीच हलाखीचे आणि दर्दभरे झाले. पत्नीच्या कोरोनामुळे निधन झाल्याने शासकीय योजनेतून ५० हजार रु. मंजूर झाल्याचे समजले आणि आयुष्याच्या संध्याकाळी सरकारी मदतीच्या रुपाने आशेचा किरण गवसल्याचा भास झाला.काल धावतच तो प्रकाशा येथील स्टेट बॅंकेत गेला. ते ५० हजार त्याने बॅंकेतून काढून घेतले. पैशाची पिशवी पत्नीच्या आठवणीने ओलावलेल्या डोळ्यांना लावली. घरी परतताना पत्नीच्या आठवणीने गळ्याशी दाटलेला आंवंढा गिळण्यासाठी पाणी पिण्यासाठी एका हॅाटेलवजा टपरीवर थांबला.सरकारी दिलासा मिळाल्याने तो थोडा रिलॅक्स झाला होता. तेवढ्यात चोरट्याने डाव साधला. क्षणात पैशाची पिशवी गायब झाली. आयुष्यात पहिल्यांदा इतके पैसे एकदम पाहिलेले.पण तेही काही क्षणाचेच सोबती. मघाशी अर्धवट गिळलेला हुंदका आता गळ्यातून बाहेर पडला. आयुष्यातल्या अखेरच्या दिवसात दारिद्र्यासोबत वाट्याला आलेली हतबलता मात्र तशीच गिळून तो नशीबाला दोष देत मार्गस्थ झाला.
आज वृत्तपत्रात बातमी वाचून नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांनी त्याला आपलेसमोर समक्ष हजर करण्याचे शहादा पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना फर्मान सोडले. शहादा पो.स्टे.च्या पोलीस गाडीतून त्याला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणले गेले.कालच्या धक्क्यातून अद्याप तो सावरेलेला नव्हताच. पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल केली होती. आता थेट एस.पी.नीच का बोलावले असावे म्हणून तो आणखीच घाबरलेला होता. तेथे गेल्यावर त्याला आणखी मोठा बसला परंतु हा गोड धक्का होता. पोलीस अधीक्षकांनी ५० हजार रु. त्याच्या हातात ठेवले.”तुमचे चोरीला गेलेले पैसे आम्ही शोधून देऊच परंतु माझ्या सहकारी पोलिसांनी तुमच्यासाठी वर्गणी काढून पैसे जमवले आहेत त्याचा स्वीकार करा” म्हणून खुद्द एस.पी. नी विनंती केली. पोलिसांनी माणुसकीच्या भावनेतून जमा केलेले पैसे स्विकारताना त्याला रडू कोसळले.एका वृद्धाचे लुटलेले समाधान वर्गणी काढून परत करताना उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनाही गहिवरून आले.
नंदूरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून अपर पोलीस अधिक्षक विजय पवार,शहाद्याचे पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे,एल.सी.बी. चे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत,वाचक अर्जुन पटले आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या वृद्धास ही मोलाची आणि माणुसकीची मदत करुन पोलीसातील माणुसकीचा परिचय करुन दिला. “आता चार दिवस जास्त जगेन” असे म्हणत तो ७५ वर्षांचा वृद्ध शहादा पो.स्टे.च्या गाडीत स्वतःहून जाऊन बसला. मात्र यावेळी त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. नंदुरबार पोलीसही साश्रू नयनांनी त्याच्या आनंदात सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा
Previous Post

महिला आयोगातर्फे 10 फेब्रुवारी रोजी नंदुरबारला जनसुनावणीचे आयोजन

Next Post

काका गणपती मंडळातर्फे पंचधातु निर्मित मूर्तीची चलप्रतिष्ठापना

Next Post
काका गणपती मंडळातर्फे पंचधातु निर्मित मूर्तीची चलप्रतिष्ठापना

काका गणपती मंडळातर्फे पंचधातु निर्मित मूर्तीची चलप्रतिष्ठापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add