Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांना प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन

team by team
February 3, 2022
in शैक्षणिक
0
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांना प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर (राज्यमंत्री) यांचा नंदुरबार दौऱ्यावर आले असता जिल्हा परिषद नंदुरबार याहा मोगी माता सभागृह येथे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अप्रशिक्षित निमशिक्षकांना जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावुन घेणेबाबत संदर्भ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. एसएसए -२००९ / प्र.क्र.९० / प्राशि -४ / मुंबई दि . ३१ जुलै २००९ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय क्र. एसएसए -२०१२/ प्र.क्र.२५० / प्राशि -४ मंत्रालय, मुंबई दि.१ मार्च २०१४ सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात एकुण २१७ रुपांतरीत वस्तीशाळा व बंद नाविन्यपूर्ण ” पर्याय शिक्षण केंद्रातील निमशिक्षक एकुण ३२९ असे ५४६ निमशिक्षकांचा उक्त संदर्भ क्र.२ नुसार जिल्हा परिषद सेवेत सामावुन घेणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे. परंतु ८ निमशिक्षकांना वेळोवेळी आयोजित केलेल्या शिबिरास हजर राहणे आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणे , इत्यादी कारणास्तव सदर नियुक्तीची कार्यवाही करण्यात आलेली नाही. तथापी उक्त संदर्भ क्र.२अन्वये एकुण ८ निमशिक्षकांपैकी २ निमशिक्षक पत्राद्वारे प्रशिक्षित असून उर्वरीत ६ निमशिक्षक अप्रशिक्षित यांची नावे खालीलप्रमाणे आहे. हिरालाल नाग्या वळवी , जि.प.शाळा थेवापाणी ता . अक्कलकुवा, सायसिंग भिमसिंग वळवी, जि.प.शाळा पाटीलपाडा ता. तळोदा , सायसिंग चुंडा पटले ( अप्रशिक्षित ) जि.प.शाळा पाटीलपाडा ( भा.) ता.अक्कलकुवा , बामण्या फुलजी तडवी , जि.प.शाळा बारीपाडा ता. अक्कलकुवा, रमेश भटा पावरा, जि.प.शाळा अंधारपाडा ता.शहादा, जयसिंग चतुर पावरा , वस्तीशाळा कुकलटचा महुपाडा ( काकरदा ) ता.धडगांव , करणसिंग इमरमा वळवी , वस्तीशाळा आसनबारीपाडा ता. धडगांव तरी वरीलप्रमाणे निमशिक्षक हे मागील १० वर्षांपासून जिल्हा परिषदेत वेळोवेळी चकरा मारुन देखील प्रशासनाने त्यांना आजपावेतो न्याय मिळवून दिलेला नाही. तरी आपण आपल्या स्तरावरुन संबंधितांना आदेश देवून जिल्हा परिषद सेवेत सामावुन घ्यावे अशी विनंती करण्यात आली आहे. प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी सविनय सादर प्रत ना.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , मंत्रालय, ना. बच्चुभाऊ कडू राज्यमंत्री शालेय शिक्षण, जिल्हाधिकारी, खा.डॉ.हिना गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जि.प.अध्यक्षा ॲड. सिमा वळवी,जि.प. उपाध्यक्षा. ॲड.राम रघुवंशी उपाध्यक्ष अजितदादा सुरुपसिंगजी नाईक शिक्षण सभापती, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, विकास घुगे राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले आहे.यावेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत,दिलवरसिंग वळवी, दिलीप वसावे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथील शीतल चौधरी यांचा मुंबई येथे क्वीन लीग गोल्डन अवॉर्डने विशेष गौरव

Next Post

शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावे

Next Post

शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add