Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चोरट्यांनी चक्क कोरोनाने मृत झालेल्या महिलेची सानुग्रह रक्कम पळविली,वृद्ध पती ढसाढसा रडत बसला

team by team
February 3, 2022
in क्राईम
0
चोरट्यांनी चक्क कोरोनाने मृत झालेल्या महिलेची सानुग्रह रक्कम पळविली,वृद्ध पती ढसाढसा रडत बसला

नंदुरबार | प्रतिनिधी-
कोरोना या महामारीने मृत्यू झालेल्या पत्नीचे अर्थसहाय्य बँक खात्यावर जमा झाले होते. ती पन्नास हजार रुपयांची रक्कम काढण्यासाठी मयत महिलेचा वृद्ध पती प्रकाशा येथील बँकेत गेला. त्या बँकेतून वृद्धाने ५० हजार रुपये काढले आणि नातवांसाठी एका हॉटेलवर खाऊ घेत असतानाच ५० हजार रुपयांची ती पिशवी चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना काल दि.२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.
कोरोनाने मृत्यू झालेल्या पत्नीचे अर्थसाह्य शासनाने दिले. मात्र त्याचा चोरट्यांनी ते पळविल्याने तो वृद्ध ढसाढसा रडत बसला. शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील पदम हारचंद कोळी यांच्या पत्नीचा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मृत्यू झाला होता.शासनाने कोविडमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार डामरखेडा येथील पदम कोळी या वृद्धाच्या बँक खात्यात ५० हजार रुपयांची रक्कम जमा देखील झाली होती.
ती रक्कम काढण्यासाठी तो वृद्ध जवळच्या प्रकाशा येथील बँकेत दि.२ फेब्रुवारी रोजी गेला होता. त्या वृद्धाने उदरनिर्वाह करण्यासाठी बँकेतून ५० हजार रुपयांची रक्कम काढली. बसस्थानकावर आल्यावर त्याठिकाणी नातवांसाठी एका हॉटेलात खाऊ घेत असतानाच त्यांच्या हातातील पैशांची पिशवी चोरट्यांनी पळवून नेली.
घटनास्थळी त्या वृद्धाने आरडाओरड केली. परंतु चोर तेथून पळ काढण्यात यशस्वी झालेत. या घटनेने तो वृद्ध कमालीचा हताश होऊन ढसाढसा रडत बसला. शासनाने दिले मात्र चोरांनी ते पळविले अशी म्हणण्याची वेळ आलीय.
या घटनेची आपबिती कथन करण्यासाठी त्या वृद्धाने प्रकाशा येथील पोलिस ठाणे गाठले व तेथे हकीगत सांगितली. पोलिसांनी त्या वृद्धाची फिर्याद नोंदवून घेतली आहे .
प्रकाशा हे गाव दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या ठिकाणी विविध राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे बसस्थानक परिसरात नेहमी वर्दळ असते. याचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी करण्याचा सिलसिला सुरूच ठेवला आहे.
प्रकाशात चोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचा आरोप आता नागरिक करू लागले आहेत.हा कलंक पुसून टाकण्यासाठी प्रकाशा पोलिसांनी त्या चोरांचा कसून शोध घेऊन वृद्धाची पळविलेली पन्नास हजाराची रक्कम परत मिळवून देण्याचे आव्हान स्वीकारावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गणेश जयंती निमित्त दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्याचे जयनगर विश्वस्त मंडळाकडून आवाहन

Next Post

स्काऊट गाईड राज्यपुरस्कार जिल्हास्तरीय पूर्वतयारी चाचणी शिबीर उत्साहात

Next Post
स्काऊट गाईड राज्यपुरस्कार जिल्हास्तरीय पूर्वतयारी चाचणी शिबीर उत्साहात

स्काऊट गाईड राज्यपुरस्कार जिल्हास्तरीय पूर्वतयारी चाचणी शिबीर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add