म्हसावद l प्रतिनिधी
तळोदा येथील नेमसुशिल विद्यामंदिरातील माजी विद्यार्थी ओम हेमंत चौधरी व चंद्रशेखर गजानन काटे या विद्यार्थ्यांकडून चालू शैक्षणिक वर्षातील गरजू विद्यार्थ्यांना स्काउट गणवेश व साहित्य तसेच शालेय गणवेश देण्यात आले.
ज्ञान सेवा आणि बल या मूल्यावर आधारित स्काऊट चळवळीचे ब्रीद खरे ठरवीत सेवा परमोच्च धर्म रुजविण्याच्या चळवळीतून स्काऊट शिक्षण, संस्काराचे शिक्षण या मूल्यांचा प्रत्यय विद्यार्थ्यांच्या कार्यातून दिसून आला. या अनोख्या कार्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष निखील तुरखिया, संचालिका सौ.सोनाबेन तुरखिया, उपाध्यक्ष दगेसिंग महाले आप्पा, सचिव संजय पटेल व संस्था समन्वयक हर्षिल तुरखिया, प्राचार्य सुनील परदेशी, मुख्याध्यापिका भावना डोंगरे, स्काउट शिक्षक आय.पी. बैसाणे, श्रीमती. रेखा मोरे, शिक्षक रविंद्र गुरव, सचिनकुमार पंचभाई, मिलिंदकुमार पाटोळे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद अभिनंदन केले.