म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अकॅडेमिक डीन डॉ. डी. एम. पटेल यांची जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल इंजीनियरिंग विभागाच्या अभ्यास मंडळावर निवड करण्यात आली असून त्याबाबतचे विद्यापीठाकडून नुकतेच पत्र प्राप्त झाले.
डॉ.डी. एम. पटेल यांचा अनुभव, संशोधन आणि कार्याची दखल घेऊन त्यांना मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल इंजीनियरिंग विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रा.डॉ.डी.एम.पटेल हे पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात अकॅडेमिक डीन म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे आतापर्यंत 50 पेक्षा जास्त शोध निबंध तसेच संशोधन, पेटंट, कॉपीराईट यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहेत. त्यांनी अनेक परिसंवाद, कार्यशाळा आणि परिषदेमध्ये सहभाग नोंदविला आहे. डॉ पटेल हे सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मेकॅनिकल विभागाच्या संशोधन मार्गदर्शक आणि मान्यता समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाच्या विविध समितीमध्ये कार्यरत आहेत. सध्या डॉ.पटेल यांच्याकडे विविध महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी पी.एच.डी.साठी नोंदणी केली असून त्यांना संशोधन मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. तसेच 2 विद्यार्थ्यांना सह – संशोधन मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अनेक विद्यार्थ्यांना प्रोजेक्टसाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांचा ह्या संपूर्ण कार्यशैली व अनुभवामुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल इंजीनियरिंग विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
डॉ. पटेल यांच्या या निवडीबद्दल पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. आर.एस. पाटील, प्राचार्य डॉ. एन.जे. पाटील, प्राचार्य डॉ. पी.एल. पटेल, प्राचार्य डॉ. एस.पी. पवार, प्राचार्य बी.के. सोनी, कुलसचिव दिनेश पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच मंडळातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी डॉ डी.एम. पटेल यांचे अभिनंदन केले.