नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील वाघेश्वरी चौफुलीकडून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात असतांना कंटेनरने त्यांच्या वाहनाला मागून धडक दिली.मात्र वाहनाचा वेग कमी असल्याने सुदैवाने कोणालाही काहीही दुखापत झाली नाही.वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.दरम्यान,घटनास्थळी मात्र मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी हे अक्कलकुवा येथील महाकाली माता यात्रोत्सवासंदर्भात परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सहकाऱ्यांसोबत जात होते.यावेळी त्यांच्यासोबत वाहनात महाकाली माता मंदीर ट्रस्टचे उपाध्यक्ष पृथ्वी पाडवी, सचिवांसह विश्वस्त वाहनात होते.वाघेश्वरी चौफुलीजवळून आमशा पाडवी यांचे वाहन दि. १ फेब्रुवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान जात असतांना कंटेनर चालकाने मागून धडक दिली.यात वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.सुदैवाने कोणालाही काहीही इजा झाली नाही.दरम्यान,घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.दरम्यान, कंटेनर चालकास पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते.मात्र आमशा पाडवी यांनी फिर्याद न देता कंटेनर चालकास समज देवून सोडण्यात आले.