नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील मिठ्याफळी गावाच्या शेत शिवारात मका पिकाला पाणी देत असल्याच्या कारणावरुन एकास कोयता, लाठ्याकाठ्या घेवून धक्काबुक्की करीत दमदाटी केल्याप्रकरणी पाच संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा येथील अब्दुल शकुर अब्दुल रहेमान अन्सारी हे मिठ्याफळी गावाच्या शेत शिवारातील सर्व क्र.२९/०१ व २९/०२ मध्ये मका पिकाला पाणी देत होते. या कारणावरुन वजीरोद्दीन मुशिरोद्दीन मक्राणी, नाजिमोद्दीन बद्रोद्दीन मक्राणी, सलिमोद्दीन बद्रोद्दीन मक्राणी, सईदोद्दीन उर्फ बारक्या बद्रोद्दीन मक्राणी व अफजलोद्दीन मुनाफोद्दीन मक्राणी (सर्व.मक्राणीफळी ता.अक्कलकुवा) हे पाच जण कोयते व लाठ्या घेवून शेतात आले. अब्दुल शकुर अब्दुल रहेमान पिंजारी यांना शिवीगळ करीत दमदाटी करुन धक्काबुक्की करीत शेताच्या बाहेर ढकलून दिले. तसेच शेतातील घराच्या दरवाजाला लाथ मारुन दरवाजाचे कुलूप तोडून नुकसान केले. पुन्हा शेतात पाय ठेवल्यास ऊसाला जाळून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत अब्दुल शकुर अब्दुल रहेमान अन्सारी यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात पाच संशयितांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ४२७, ४४७, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर करीत आहेत.