Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नियमित पदोन्नती नाकारणाऱ्या प्राथमिक शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी काढता येणार नाही : शालेय शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश

team by team
January 31, 2022
in शैक्षणिक
0

नंदूरबार l प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षकांनी नियमित पदोन्नती नाकारल्यामुळे चटोपाध्याय वेतनश्रेणी काढून घेण्याबाबत शासनाचे अद्याप कोणतेही धोरण नसल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने केलेली कार्यवाही नियमानुसार नसल्याचे स्पष्ट करीत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्गमित केलेला आदेश रद्द करण्याचे पत्र शालेय शिक्षण विभाग मंत्रालय यांनी दिली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे व विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड यांनी दिली.
अन्यायग्रस्त 71 प्राथमिक शिक्षकांकरता गत एक वर्षापासून शिक्षक परिषदेमार्फत विभागीय आयुक्त कार्यालय ते मंत्रालय स्तरावर पाठपुरावा चालू होता या पाठपुराव्यास आज अखेर यश मिळाले असून अन्यायग्रस्त शिक्षकांनी शालेय शिक्षण विभागाच्या आदेशाचे व शिक्षक परिषदेचे स्वागत केले आहे.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तत्कालीन शिक्षणाधिकारी व प्रशासन अधिकारी यांच्या चुकीच्या आदेशामुळे पदोन्नती नाकारणार्‍या 71 शिक्षकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला तर अनेक शिक्षक निवृत्त झाले ते त्यांच्या निवृत्ती उपदान पासून त्यांना वंचित राहावे लागले. पदोन्नती नाकारणार्‍या शिक्षकांवर आठ महिने उशिरा हेतुपुरस्कर कार्यवाही केली असून ती मागे घेण्याची विनंती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केली होती परंतु तत्कालीन शिक्षण अधिकारी यांनी त्यास नकार दिला त्यामुळे शिक्षक परिषदेस विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल करावी लागली या अपिलाच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ जी गावडे यांनी कार्यवाहीस शिक्षक परिषदेच्या विनंतीनुसार तात्पुरती स्थगिती देऊन अन्यायग्रस्त शिक्षकांना दिलासा दिला व शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागविले व त्यासाठी परिषदेने पाठपुरावा करावा असे सांगितले त्यानुसार वेळोवेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मार्फत राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे व राकेश आव्हाड यांनी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला याकामी त्यांना विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल विभागीय कार्यकारी सदस्य आबा बच्छाव जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी,किरण घरटे,धनंजय सूर्यवंशी,प्रकाश बोरसे दिनेश मोरे,शरद घुगे,गोकुळदास बेडसे यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

मका पिकाला पाणी देत असल्याच्या कारणावरुन दमदाटी केल्याप्रकरणी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Next Post

गांधीधाम पुरी एक्सप्रेसच्या आग प्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा

Next Post
‘द बर्निंग ट्रेन’ ; अखेर गांधीधाम-पुरी एक्सप्रेस रवाना, आगीचे कारण गुलदस्त्यात

गांधीधाम पुरी एक्सप्रेसच्या आग प्रकरणी अज्ञाताविरूध्द गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add