नंदुरबार l प्रतिनिधी
प्रत्येक शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावा, या उद्देशाने ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना’ मग्रारोहयोतून राबविण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील जास्तीत जास्त नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिरी, गोठा कॉंक्रिटीकरण व मातोश्री पानंद रस्त्याच्या वैयक्तिक पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे वाटप शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
नंदुरबार पंचायत समिती अंतर्गत ३९ पात्र लाभार्थ्यांना आदेश वितरित करण्यात आले.याप्रसंगी जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी, पंचायत समितीचे उपसभापती कमलेश महाले, शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, जि.प.सदस्य. देवमन पवार.डॉ.सयाजीराव मोरे, सुरेश शिंत्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील. पंचायत समिती सदस्य तेजल पवार,प्रल्हाद राठोड, संतोष साबळे,अंबु पाडवी,सुनील पाडवी, धर्मेंद्र परदेशी व तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
अशी आहे योजना
ग्रामीण भागात म.गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्ग वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असतात.अनियमित,अपु-या पावसामुळे गेल्या काही वर्षात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. दुष्काळी स्थितीमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. शासनाकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात मदत व पुनर्वसन विभागाकडून मोठ्या प्रमाणात मदत करण्यात येत आहे. यावर शाश्वत व कायमस्वरुपी उपाययोजना करणेची आवश्यकता असल्याने सिंचन विहिरी च्या लाभ देण्यात येत असतो. प्रत्येक शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावा, या उद्देशाने ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना’ मग्रारोहयोतून राबविण्यात येत आहे. गाव समृद्ध करण्यासाठी शेतरस्त्यांचे महत्व शहरांना जोडणाऱ्या महामार्गाच्या महत्त्वाएवढे आहे. पाणंद रस्त्याच्या अभावामुळे शेतमालाच्या वाहतुकीला मर्यादा येतात आणि त्यामुळे शेतकरी फायद्याचे पीकही घेत नाहीत. त्यामुळे प्रमाणित दर्जाचे शेत पाणंद रस्ते तयार करण्याकरिता ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ येत आहे. त्याचप्रमाणे शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत गोठा कॉंक्रिटीकरण करण्यात येते.
असे आहेत लाभार्थी
● सिंचन विहिरीवचे ३१ लाभार्थी
● मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद रस्ते योजनेअंतर्गत २ लाभार्थी
● गोठा कॉंक्रिटीकरण अंतर्गत ६ लाभार्थी