नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग सुरु उद्या दि.1 फेब्रुवारी पासून सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी परीपत्रकाद्वारे केली आहे.
या पत्रकात म्हटले आहे की,
दि. 24 जानेवारी , 2022 पासून शाळा सुरु करणे संदर्भात शासननिर्देश प्राप्त आहेत . त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग अंतर्गत असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयत्ता 5 वी ते 12 वी चे वर्ग उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 अन्वये दि. 24 जानेवारी पासून सुरु करण्यात आले आहेत . तथापि , इयत्ता 1 ली ते 4 थी चे वर्ग असलेल्या शाळा मंगळवार दि. 1 फेब्रुवारी पासून सुरु करण्याबाबत खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत .शाळेची वेळ विद्यार्थ्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी 3 अशी असेल तर शिक्षकांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित रहावे . ज्या मोठ्या गावांमध्ये व नगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी पालकांची संमती घेऊन शाळा सुरु करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी . शाळांमध्ये कोरोना बाधित शिक्षक अथवा विद्यार्थी आढळून आल्यास सदर शाळा 5 दिवस बंद ठेवावी , उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 च्या शासन परिपत्रकास संलग्न केलेले परिशिष्ट – अ व परिशिष्ट – ब बाबत काटेकोर पणे अंमलबजावणी व कार्यवाही करण्यात यावी . शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेने नियोजन करुन शालेय कामकाज कोव्हीड -19 च्या निर्देशाप्रमाणे सुरळीत सुरु राहील याबाबत दक्षता घ्यावी असे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहे.