नंदुरबार l प्रतिनिधी
21 जानेवारी 2022 रोजी विसरवाडी ग्रामीण रुग्णालय येथून 108 रुग्णवाहिकेने एक अनोळखी वृध्द महिला वय अंदाजे 75 वर्ष हिस जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे बेशुध्द अवस्थेत औषधौपचारासाठी दाखल केले होते. सदर अनोळखी महिला बोलण्याच्या स्थितीत नसल्याने नाव गाव समजू शकले नाही. सदर महिलेवर औषधौपचार चालू असतांना 26 जानेवारी 2022 रोजी 8.15 वाजता डॉ.प्रविण सोगवीकर यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले आहे.
सदर अनोळखी मयत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. व त्याचे वारस मिळून आलेले नाहीत. तरी सदर अनोळखी महिलेबाबत काही माहिती असल्यास पोलीस निरीक्षक विसरवाडी येथे संपर्क साधावा असे सहायक पोलीस निरीक्षक,विसरवाडी यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.