Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गांधीधाम पूरी एक्स्प्रेसच्या आगीबाबत रेल्वे प्रबंधकांसह सात अधिकाऱ्यांचे पथकाने कर्मचाऱ्याची केली चौकशी

team by team
January 31, 2022
in क्राईम
0
नंदूरबार रेल्वे स्टेशन वर गांधीधाम पुरी रेल्वेला भीषण आग, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार रेल्वे स्थानकात प्रवेश करण्यापूर्वीच गांधीधाम पूरी एक्स्प्रेसच्या पॅन्ट्री कारला आग लागल्याने यात पॅन्ट्री कोच जळून खाक झाला. याप्रकरणी चौकशीसाठी रेल्वे प्रबंधकांसह सात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नंदुरबारला दाखल होत पॅन्ट्री कोचची पाहणी केली. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली असून आठवडाभरात अहवाल प्राप्त झाल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काय अहवाल प्राप्त होतो याकडे लक्ष लागून आहे.दोन दिवसानंतरही आगीचे कारण कळू शकले नाही.
नंदुरबार रेल्वे स्थानकानजीक सुरत येथून सकाळी निघालेल्या गांधीधाम पूरी एक्स्प्रेसमधील पॅन्ट्री कारला दि.२९ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. सुमारे दोन तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली होती. मात्र तोपर्यंत पॅन्ट्री कारच्या आतमधील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने कोचच्या आतमध्ये कोळसा झाला होता. सदरच्या घटनेने सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी प्रवाशांचे जिवित मात्र धोक्यात आले होते. यात रेल्वेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे दि.२९ रोजी सायंकाळी रेल्वे प्रबंधकांसह सात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नंदुरबार येथे चौकशीसाठी दाखल झाले होते. सदर पथकाने रात्री 8 वाजेपर्यंत रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांची चौकशी केली. काल दिवसभरात कोणताही अहवाल प्राप्त झाला नसल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, येत्या आठवडाभरात याबाबतचा अहवाल प्राप्त होणार असून पॅन्ट्री कोचला आग नेमकी कशामुळे लागली? हे समजणार असून दोषी आढळून येणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. यामुळे आता सदरच्या अहवालाकडे लक्ष लागून आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रनाळे ग्रामपंचायतीस पाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे दिपक गवते यांनी मानले आभार

Next Post

नेमसुशिल विद्यामंदिरात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Next Post
नेमसुशिल विद्यामंदिरात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

नेमसुशिल विद्यामंदिरात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add