नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील रनाळे ग्रामपंचायतीस शुद्ध फिल्टर पाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटी 29 लाख रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवसेनेचे जिल्हा समन्वयक दिपक गवते यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,यांनी नंदुरबार तालुक्यातील रनाळे ग्रामपंचायतीस शुद्ध फिल्टर पाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटी 29 लाख रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नंदुरबार जिल्हा शिवसेनेचे समन्वयक दिपक गवते,योगेंद्र गवते,दीपक गीते,राजू पठाण यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत रनाळे गावाच्या लोकनियुक्त सरपंच सौ. तृष्णा गवते व सर्व ग्रामपंचायत सदस्य शिवसैनिक व ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त मानले.