नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा शहरातील शिवम सिटीमधून घरफोडी करत १२ हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा शहरातील शिवमसिटी येथे प्लॉट क्र. ६.ए येथे राहणार्या मुकेश चुडामण माचवे यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरटयांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करीत ७ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत व ५ हजार ५०० रूपये रोख तसेच बँकेचे पासबुक लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुकेश चुडामण माचवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयाविरूध्द शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास अशोक कोळी करीत आहे.