नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.नंतर मागासवर्गीय कन्या छात्रालय भालेर येथे 26 जानेवारी प्रजाकसत्ताक दिनानिमि्ताने कोविड 19 नियमांचे पालन करून ध्वजारोहण करण्यात आले.
मागासवर्गीय कन्या छत्रालयाचे ध्वजारोहण माध्यमिक विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक प्रल्हाद पितांबर बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. तर विद्यालयाचे ध्वजारोहण सेवानिवृत्त पर्यवेक्षक कैलाश श्रावण बागुल यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव भिका पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील,भालेर ग्रा. प. सदस्या सुमनबाई वल्लभ भील, सौ. कविता चंद्रशेखर पाटील तसेच संस्थेचे शालेय समिती सदस्य संस्थेचे संचालक वासुदेव पाटील, देविदास पाटील, गुलाब मंगा पाटील ,सुनील पाटील, माजी सैनिक राजेन्द्र पाटील, शाळेच्या प्राचार्या सौ. विद्या चव्हाण, संस्थेचे हितचिंतक व ग्रामस्थ भालेर, नगाव, तीसी व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रमोद सूर्यवंशी यांनी केले. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी विद्यार्थी उपस्थित होते.








