म्हसावद l प्रतिनिधी
खेतिया नाभिक समाज महिला मंडळ यांनी पानसेमल तालुक्यातील नाभिक समाज महिलांचा स्नेहमिलन कार्यक्रम नाभिक समाज भवन खेतिया येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गायत्री शक्ती पीठ परिवार महिला मंडळ अध्यक्षा शालिनीताई भावसार, गायत्री शक्ती पीठ ट्रस्ट मुख्य सदस्य शंभुजी शाहु, प्रकाश शार्दुल, खेतिया नाभिक समाज महिला अध्यक्षा रूपाली सोनवणे यांच्या हस्ते समाजाचे आराध्यदैवत संतशिरोमणी सेना महाराज, सरस्वती माता, सावित्रीबाई फुले यांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षा रूपाली विनोद सोनवणे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शालिनी भावसार यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करतांना महिला सशक्तीकरण, संघटन, शिक्षण, स्वयंरोजगार आत्मनिर्भरता, स्वावलंबन व्यसनमुक्ती या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शंभुजी शाहु, प्रकाश शार्दुल यांनी हार्मोनियम वर गायत्री मंत्र धुन गावुन मंत्रमुग्ध केले. स्नेहमिलन कार्यक्रमात उपस्थित महिलांनी एक दुसर्याला हळदी कुंकू लावून स्नेहाची भेट वस्तु देऊन सन्मानित केले.कायॅक्रमास खेतिया, पानसेमल, मलफा, टेमली, मेलन, खेडदिगर येथील बहुसंख्येने महिला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता सोनवणे, अर्चना सोनवणे, नयना सिरसाठ, चंद्रकला सिरसाठ, जागृती बोरसे, सुभद्रा सूर्यवंशी, सुमन चौहान, अलका बोरसे, संगिता सिरसाठ, विजया पवार, माधुरी सिरसाठ, ललिता निकुम, नुतन बोरसे, योगीता सूर्यवंशी, मोतन सैंदाणे, आशा वारूळे यांनी परिश्रम घेतले.