धडगांव ! प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार आज रोजी सकाळी 11 वाजता पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढीच्या विरोधात धडगांव तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपावर निषेधाचे फलक झळकावून केंद्रातील भाजप सरकार विरोधात तीव्र निषेधाच्या घोषणा करून केंद्रातील मोदी सरकार विरोधात तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
मोदी सरकार हे मूठभर उद्योपतीसाठी काम करणारे, यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव जिल्हा प्रभारी नंदुरबार राहुल माणिक म्हणाले की, केंद्रातील भाजप प्रणित मोदी सरकारने पेट्रोल,डिझेल व गॅसमधून कराच्या रूपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवून सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे.
धडगांव तालुका युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तुकाराम पावरा म्हणाले की, केंद्र सरकार दरवाढ मागे घेत नाही,तोपर्यंत युवक काँग्रेसच्या वतीने अंदोलन चालू ठेवणार. या आंदोलनात कोविड पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष तथा प.समिती सदस्य विलास पाडवी,तालुका युवक काँग्रेस सचिव सुरेश वळवी,धडगांव शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कल्याणसिंग पावरा, धडगांव शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल पावरा,धडगांव शहर युवक काँग्रेस सचिव राकेश पावरा,ईश्वर पावरा,बबन तडवी, दारासिंग पाडवी, ग्रा.प.स.विलास पाडवी, दाखलसिंग पावरा,वाण्या पावरा आदी काँग्रेस युवक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.