नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट देत तालुक्यातील भाजपाच्या कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी त्यांनी भाजपा विस्तारा संदर्भात तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्याशी सविस्तर चर्चा देखील केली.या प्रसंगी नवापूर शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांची ओळख परिचय विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याशी करण्यात आली.याप्रसंगी भाजपा अल्पसंख्याक विकास प्रदेशाध्यक्ष एजाज शेख, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, जयंतीलाल अग्रवाल, नगरसेवक महेंद्र दुसाने,जितेंद्र अहिरे, अजय गावित, माजी नगरसेवक रमला राणा, दिनेश चौधरी, भाजपा शहराध्यक्ष प्रणव सोनार, हेमंत जाधव, जाकिर पठाण,कुणाल दुसाने, राहुल मराठे, हेमंत शर्मा,अनिल दुसाने, गोपी सैन, सौरव भामरे आदी उपस्थित होते.








