नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरात शिवसेना प्रमुख हिंदूदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नवापूर शहर शिवसेना युवासेना तर्फे महाप्रसाद चे वाटप व प्रतिमा पूजन गांधी पुतळा परिसरात येथे आयोजित करण्यात आला.
या महाप्रसाद वाटपाचे कार्यक्रमाचे आयोजन युवासेनेचे उपजिल्हाधिकारी दिनेश भोई व शिवसेनेचे किशन शिरसाठ यांनी केले. यावेळी सर्व प्रथम बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुजन जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील,शहर प्रमुख अनिल वारूळे, माजी नगरसेवक अजय पाटील,नंदु चौधरी,शहर उपप्रमुख हितेश पाटील,फिरोज गणी,दर्पन पाटील,मनोज वाडीले,दिनेश खैरनार,मानवता फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील,यांनी प्रतिमेचे पुजन करुन प्रसादाचे वाटपाला सुरुवात करण्यात आली.यावेळी हर्शल माळी,राकेश सोनवणे,मुकेश नायका,बिलाल सैय्यद,प्रशांत हिरे,राहुल पाटील,दिनेश खैरणार,विजय पाटील,पप्पू पवार,धनराज शिरसाठ आदी शिवसेनेचे पदधिकारी उपस्थित होते.