Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षक परिषद दिनदर्शिका 2022 चा प्रकाशन सोहळा आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते उत्साहात

team by team
January 23, 2022
in राजकीय
0
शिक्षक परिषद दिनदर्शिका 2022  चा  प्रकाशन  सोहळा आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते उत्साहात

तळोदा l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा सन 2022 चे वार्षिक दिनदर्शिका प्रकाशन सोहळा शहादा तळोदा मतदार संघाचे आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते त्याच्या कलावती फार्म सोमावल येथे शिक्षक परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नंदुरबारच्या शाखा स्थापनेपासून आजतागायत शिक्षक परिषदेने राष्ट्रहित , शिक्षणहित, विद्यार्थीहित आणि शिक्षकहित या चतुसूत्री आधारित केलेल्या विविध कार्याचे जिल्हाभरात राबवलेल्या विविध उपक्रमांचे शिक्षक हितासाठी केलेले आंदोलने , मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठका, खुले अधिवेशन, निवासी अभ्यास वर्ग , शैक्षणिक परिसंवाद, जिल्हा परिषदेतील बैठका, विविध सामाजिक उपक्रम , रक्तदान ,फराळ वाटप, बिरसा मुंडा जयंती, शिवजयंती भारतमाता पूजन, संविधान पूजन अश्या विविध सामाजिक, शैक्षणिक व राष्ट्रीय उपक्रमांची माहिती छायाचित्रासहित सदर 2022 ची रंगीत वार्षिक दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली असून सदर दिनदर्शिका प्रत्येक पंचायत समिती व जिल्हा परिषद आणि नंदुरबार जिल्ह्यातील 1398 जिल्हा परिषद शाळांना विनामूल्य भेट देण्यात येणार आहे शिक्षक परिषदेचे कार्य निश्चित उल्लेखनीय असून एक मजबूत संघटन शिक्षक परिषदेने उभारलेले आहे राष्ट्रीय विचाराने प्रेरित होऊन शिक्षक परिषद काम करत आहे. शिक्षकांच्या न्यायहक्कासाठी ज्या ज्या वेळेस माझी आवश्यकता भासेल त्या त्या वेळेस सर्वतोपरी मी आपल्यासोबत राहणार असल्याचे सांगून शिक्षक परिषदेचा पालक असल्याचा मला मनस्वी आनंद असल्याचे प्रतिपादन आमदार राजेश पाडवी यांनी याप्रसंगी करत शिक्षक परिषदेच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. सदर प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड यांनी केले तर संचलन जिल्हा कार्यवाह किरण घरटे यांनी केले परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, नाशिक विभागाचे कार्यवाह रामकृष्ण बागल, विभागाचे विभागाचे सदस्य आबा बच्छाव, जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष शरद घुगे, संघटनमंत्री प्रकाश बोरसे, जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय सूर्यवंशी व दिनेश मोरे, जिल्हा नेते देवेंद्र बोरसे, प्रसिद्धी प्रमुख मनोज चौधरी, कार्यालयीन मंत्री जगदीश पाटील, जिल्हा सहकार्यवाह किशोर ठाकरे, महिला आघाडीच्या प्रमुख चेतना चावडा, सरिता काळे,चेतना तावडे, वैशाली घुगे,शुभांगी सोनवणे,वंदना न्हावडे, तळोदा तालुका अध्यक्ष मानसिंग पाडवी, तालुका कार्यवाह रणधीर भामरे , मगन पाडवी, जयवंत वळवी , कुवरसिंग किराडे , गोमा पावरा,रतिलाल पावरा ता महिला अध्यक्ष श्रीमती लता पावरा , गोकुळ मोरे, अनिल माळी , हेमराज माळी चुणीलाल वसावे शहादा तालुका सिद्धार्थ बैसाणे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र सानप तालुका प्रसिद्धी प्रमुख संजय गिरासे तालुका संपर्क प्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथे हिन्दूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने अन्नदान

Next Post

बोरद येथे अवकाळी पावसाची हजेरी

Next Post

बोरद येथे अवकाळी पावसाची हजेरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add