Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथे स्टेट बँक खात्याची माहिती परस्पर दुसऱ्याच्या मेलवर ; रक्कम हडप करण्याचा संशय ; कारवाईची मागणी

team by team
January 23, 2022
in क्राईम
0

शहादा l प्रतिनिधी
बँक खात्याची माहिती दुसऱ्या व्यक्तीच्या मेल वर पाठवून हॅकर मार्फत बँकेतील रक्कम परस्पर काढण्याचा हेतू असल्याची तक्रार अब्दुल्ला युसुफजी अँड सन्सचे माद मुस्तानशिर मर्चंट यांनी पोलिसांत केली आहे याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे. दरम्यान पोलिसांकडून संबंधित प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
शहादा येथील व अब्दुल्ला युसुफजी अँड सन्सचे संचालक माद मुस्तानशीर मर्चंट यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की त्यांचे शहादा स्टेट बँकेत खाते आहे त्या खात्याची परस्पर लेखी स्वरूपात संपूर्ण व्यवहाराची माहिती इस्माईल कायमभाई राजा( राज पाईपचे संचालक) व शेख मुस्तफा रायपूरवाला या दोघांनी संगणमत करून काढल्याने माझ्या खात्यातील रक्कम हडप करण्याचा हेतू असल्याचे स्पष्टपणे दिसून येते वास्तविक पाहता शहरातील अनेक व्यापाऱ्यांचे स्टेट बँक शाखेत खाते असून बँक अधिकाऱ्यांनी खाते धारकांची खातरजमा न करता अज्ञात व्यक्तीला एका चिट्टी वरून अब्दुल्ला युसुफजी या फर्मचे संचालक माद मुस्तानसीर मर्चंट यांची बँक खात्याची संपूर्ण माहिती दिली आहे त्यांचे अब्दुल्ला युसुफ अँड सन्स या नावाने कृषी दुकान असून या दुकानातील आर्थिक व्यवहाराचे खाते स्टेट बँक शाखेत खाते आहे त्यांच्या समाजाचे सचिव इस्माईल कायमभाई राजा( राज पाईपचे मालक) यांनी समाजाच्या कार्यालयात माद मर्चंट यांना बोलावून सांगितले की तुमचे स्टेट बँक शाखेतील संपूर्ण बँक स्टेटमेंट माझ्याजवळ आहे त्यामुळे माझ्या बँक खात्याचे तपशील तुमच्याकडे कसे ? असा प्रश्न मी त्यांना विचारला असता ते म्हणाले की मला शेख मुस्तफा रायपूरवाला यांनी तुमचे बँकेचे स्टेटमेंट मागण्यास सांगितले होते त्यामुळे मी त्यांना तुमचा खाते क्रमांक व शेख मुस्तफा यांचा ई-मेल आयडी एका कागदावर त्यांना लिहून बँकेत दिला होता त्यावरून बँकेने त्यांना त्यांच्या ई-मेल आयडीवर तुमच्या बँके खात्याचे स्टेटमेंट पाठविले आहे यासंदर्भात मी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की एका व्यक्तीने चिट्ठी आणून त्यांनी तुमचे नाव सांगून ई-मेल आयडीवर तुमच्या खात्याचे स्टेटमेंट मागितले त्यानुसार आम्ही त्याला तुमच्या खात्याची माहिती ईमेलवर पाठविली सदर चिट्टी वरील हस्ताक्षर व मजकूर इस्माईल कायमभाई राजा यांचे असल्याचे मी ओळखले बँकेने यासंदर्भात चूक झाल्याचे मान्य केले या प्रकारामुळे माद मर्चंट यांना संबंधित दोन्ही व्यक्तींचा हेतू बाबत संशय आला त्यांनी व्यक्तिगत खात्याची माहिती मागवून हॅकर मार्फत परस्पर बँक खात्यातील रक्कम हडप करण्याचात्यांचा हेतू असल्याचे स्पष्टपणे दिसून आल्याचे जाणवले त्यामुळे माझ्या बँक खात्याची परस्पर माहिती मिळविणाऱ्या इस्माईल कायमभाई राजा व शेख मुस्तफा रायपूरवाला या दोघांवर आय टी ऍक्ट प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार पोलिसात केली आहे पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची कसूनचौकशी केली जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

Next Post

तोलाचापड फाट्याजवळ दुचाकी पुलावरून कोसळली, अपघातात एक जण गंभीर

Next Post
तोलाचापड फाट्याजवळ दुचाकी पुलावरून कोसळली, अपघातात एक जण गंभीर

तोलाचापड फाट्याजवळ दुचाकी पुलावरून कोसळली, अपघातात एक जण गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add