नंदुरबार | प्रतिनिधी-
तालुक्यातील चाकळे येथील रामपंथी भजन मंडळाने गावातील देवस्थान शिववार्या देव परिसरात जवळपास ५०० वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविला. यात निंब, पिंपळ, चिंच आदी वृक्षांचा समावेश होता.
कार्यक्रमाला उपस्थित भजन मंडळीचे अध्यक्ष मोठा भाईदास सामुद्रे, उपाध्यक्ष सवल्या वेडू माळचे, सचिव चिंधा विश्राम पानपाटील, सदस्य रतन धना माळचे, काशीनाथ सोनवणे, भीमराव सामुद्रे, उत्तम सामुद्रे, गमर्या सोनवणे, कालू ठाकरे आदी उपस्थित होते. दिवसेंदिवस होत चाललेल्या अवैध वृक्षतोडीमुळे तसेच जंगल तोडीमुळे पर्यावरणाचा र्हास होत आहे. वेळीच याची दखल न घेतल्यास भविष्यात मोठया प्रमाणावर समस्या उद्भवणार आहेत, हे हेरुन चाकळे येथील रामपंथी भजनी मंडळाने हा स्तुत्य उपक्रम राबविला.










