Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विकास कामासाठी निधी मंजुर करुन दिल्याबद्दल आ.शिरीषकुमार नाईकांचे मानले आभार

team by team
January 22, 2022
in राजकीय
0
विकास कामासाठी निधी मंजुर करुन दिल्याबद्दल आ.शिरीषकुमार नाईकांचे मानले आभार

नवापूर l प्रतिनिधी
शहरातील जुने महादेव मंदिर परिसराच्या विकास कामासाठी निधी मंजुर करुन दिल्याबद्दल जाहीर आभाराबाबत पत्र शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हंसमुख पाटील,नगरसेविका अरुना पाटील यांनी आमदार शिरीषकुमार नाईक यांना दिले आहे
या पत्रात म्हटले आहे की, नवापूर नगरपरिषद हद्दीतील नदीकाठी स्थित असलेले जुने महादेव मंदिर परिसराच्या विकासाबाबत निधी मंजुर करुन मिळावा बाबत आपणास विनंती करण्यात आली होती. त्यानुसार आपण सदर ठिकाणी समक्ष भेट देऊन आमच्या विनंतीचा मान ठेवून आपण योग्य तो पाठपुरावा करुन सदर कामासाठी रु.५० लक्षचा निधी मंजुर करण्यासाठी आपण सहकार्य करीत असल्याचे सांगितले, त्याबद्दल आपले आभार. सदर नदीकाठी स्थित असलेले जुने महादेव मंदिर हे प्रभाग क्रमांक ७ मध्ये येत असून ते प्राचिन देवस्थान असल्याने परिसरात विस्तीर्ण अशी भली मोठी जागा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सदर परिसर विकसित नसल्याने परिसर विकसित व्हावा अशी नागरिकांची देखील मागणी होती. मी स्वतः आपली यापुर्वी याविषयी समक्ष भेट घेऊन निवेदनही दिले आणि वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा देखील मी करीत राहिले. परंतु,काही कारणास्तव निधी मिळणेस अडचणी आल्यात. या मतदार संघाचे आमदार या नात्याने आपणही निधी उपलब्धतेसाठी सातत्याने पाठपुरावा करीत होतात. या परिसराच्या विकासाकरीता जवळपास अंदाजित १ कोटी ७७ लक्षापेक्षा जास्त निधी लागत असल्याने पहिल्या टप्यात आपण रु.५० लक्षचा निधी मंजुरी करुन दिल्याने शहरातील विशेषतः प्रभागातील जनतेच्या वतीने नगरसेविका या नात्याने मी आपले शतशः आभार व्यक्त करते. लवकरच दुसर्‍या टण्यातील निधी मंजुर करुन द्याल बाबत विश्वास बाळगते.असे पत्रात म्हटले आहे.यावेळी नवापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

२६ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या वाहनासमोर आत्मदहन करण्याचा संगणक परिचालकाचा इशारा

Next Post

चाकळे येथील रामपंथी भजन मंडळाने ५०० वृक्षांचे केले वृक्षारोपण

Next Post
चाकळे येथील रामपंथी भजन मंडळाने ५०० वृक्षांचे केले वृक्षारोपण

चाकळे येथील रामपंथी भजन मंडळाने ५०० वृक्षांचे केले वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add