नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात दि.24 जानेवारी 2022 पासुन शाळा सुरु करणे संदर्भात शासननिर्देश प्राप्त आहेत . त्यानुसार शिक्षण विभागाची झुम मिटींग झाली यात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी अनुकूलता दर्शवल्याने नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबतचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज काढले.
नंदुरबार जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी , पंचायत समिती , नंदुरबार / नवापूर / शहादा / तळोदा / अक्कलकुवा / धडगाव यांना पाठवण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, दि. 24 जानेवारी , 2022 पासून जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरु करणेबाबत . शासन परिपत्रका अन्वये दि.24 जानेवारी , 2022 पासुन शाळा सुरु करणे संदर्भात शासननिर्देश प्राप्त आहेत . शाळा सुरु करण्यासाठी शासनाने वेळोवेळी परिपत्रकांद्वारे मार्गदर्शक सूचना व निर्देश दिलेले आहेत . त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरु करण्यासाठी उपरोक्त जिल्हाधिकारी मनीषा खत्री नयांनी अनुकूलता दर्शविली आहे. तसेच झुम मिटींगद्वारे जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी , प्रशासन अधिकारी , शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांच्याकडून शाळा सुरु करणे संदर्भात आढावा व माहिती घेण्यात आली असून त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सामाजिक अंतराचे पालन करुन सुरु करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत . दि.24 जानेवारी , 2022 सोमवार पासून नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा सुरु करण्यात याव्यात . शाळेची वेळ विद्यार्थ्यांसाठी सकाळी 11 ते दुपारी 3 अशी असेल तर शिक्षकांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित रहावे . ज्या मोठ्या गावांमध्ये व नगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितांची संख्या जास्त असेल अशा ठिकाणी पालकांची संमती घेऊन शाळा सुरु करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी . प्राथमिक शाळेमध्ये कोरोना बाधित शिक्षक अथवा विद्यार्थी आढळून आल्यास सदर शाळा 5 दिवस बंद ठेवावी .उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 च्या शासन परिपत्रकास संलग्न केलेले परिशिष्ट – अ व परिशिष्ट – ब बाबत काटेकोर पणे अंमलबजावणी व कार्यवाही करण्यात यावी . एकंदरीत शाळा सुरु करणेबाबत शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षकीय यंत्रणेने सकारात्मकतेने आणि विद्यार्थी हित विचारात घेऊन दि. 24 जानेवारी , 2022 पासुन प्राथमिक शाळा नियमित सुरु कराव्यात असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.