नंदुरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी मोलगी ता.अक्कलकुवा तर्फे बँक ऑफ महाराष्ट्राशाखा मोलगी विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचे आयोजित केले असता पोलिस प्रशासनाने कोविड १९ प्रतिबंध कार्यवाही म्हणुन रास्ता रोको आंदोलन कारणायची परवानगी नाकारली होती तरी सदर आंदोलनाला पर्याय म्हणुन मोलगी पोलिस स्टेशन येथे डी.वाय.एस.पी. श्री.प्रधान ,नायब तहसिलदार श्री.गांगूर्डे ,सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.निळे , मोलगी बँकचे शाखाधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या उपस्थितीत कोविड नियमाचे पालन करून ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी महसुल अधिकारी नायब तहसिलदार श्री.गांगूर्डे व मोलगी बँकचे शाखाधिकारी सौरभ त्रिपाठी यांनी येत्या १५ दिवसात सर्व समस्या सोडविण्याचे लेखी स्वरुपात मान्य केले. तरी सदर आंदोलन १५ दिवसासाठी तूर्त स्थगित करण्यात आले आहे अन्यथा मागणी पूर्ण न झाल्यास मोलगी बँक ऑफ महाराष्ट्रा शाखेला ताळे ठोकण्याचे नियोजिले आहे. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नितेश वळवी अध्यक्ष, प.स.सदस्य तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक राउत, सरपंच मनोज तडवी मोलगी भाजपा शहर अध्यक्ष सुनिल राहसे , भाजपा तालुका सरचिटणीस दिलीप वसावे, बिजरीगव्हाण सरपंच रोशन पाडवी ,रामसिंग वळ्वी, सांगल्या वसावे, सुरेश पाडवी, भिमसिंग तडवी, गोरख भोई, मोग्या डाया , सुकलाल तडवी, दिलीप बी वसावे , खोंडया वसावे, आपसिंग पाडवी, बहदुरर्सिंग पाडवी, नंदू पाडवी, बाज्या डाया, टेड्या वसावे, सायसिंग वसावे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व सर्व मोलगी परीसरतील कार्यकर्ते उपस्थित होते.








