तळोदा l प्रतिनिधी
डॉ. महेश मोरे प्रकरणी सी.बी. आय.चौकशी करण्यात यावी या मागणीचे निवेदन एकलव्य आदिवासी युवा संघटनेच्या वतीने तहसीलदार तळोदा यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, धुळे येथील डॉ. महेश मोरे आरोग्य अधिकारी महानगरपालिका येथे अनेक वर्षांपासून कार्यरत होते व धुळे येथे शासकीय सेवेत कार्यरत आहे कार्यरत असताना डॉ.मोरे हे आदिवासी समाजापैकी एक अधिकारी असल्याकारणाने त्यांना नेहमी राजकीय षड्यंत्र रचून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू होते. व डॉ.महेश मोरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजाला वेळोवेळी सहकाऱ्याच्या भूमिकेतून आदिवासी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता व आहे आणि हेच कारण जातिव्यवस्थेला मंजूर झालं नाही म्हणून डॉ. मोरे यांना कोरोना महामारीचा आधार घेऊन मोठ्या प्रमाणपत्रा बाबत खोटे गुन्हे दाखल केले त्या संदर्भात सदर प्रमाणपत्र चौकशीही सुरू होते. तपास कामी डॉ. महेश मोरे यांनी तपास अहवाल दिला दिला होता. ज्याप्रकारे डॉ. महेश मोरे यांचा काही एक संबंध नसताना जाणून-बुजून आदिवासी समाजाचे काही कार्यकर्ते असल्याने जाती व्यवस्थेने त्यांना दबाव गट निर्माण करून पदापासून दूर करणे करण्यासाठी व कार्यमुक्त करण्यासाठी दबाव तंत्र वापरून यंत्रणा काम करीत आहे या मनोज मोरे शिवसेनेचे पदधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ नेते तसेच राजकीय नेते व पोलीस प्रशासन देखील त्यांचा विरोधात काम करत असल्याचे दिसून येत आहे व त्यांना जाणीवपूर्वक गुन्ह्यात गोवण्यात आले आले असून त्यांचे वर जाती सूचक कार्यवाही योजून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न प्रथमदर्शनी दिसून आला आहे.डॉ.महेश मोरे हे वैद्यकीय अधिकारी प्रामाणिक, समाजसेवी असल्याने त्यांना लक्ष केले आहे गेले आहे.वास्तविक सदर प्रकरणाची डॉ. महेश मोरे यांचा काही एक सबंध नसताना त्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरुन त्याना जेलबंद करण्यात आले आहे.परंतु प्रस्तुत प्रकरणात डॉ.रवंदळे यांच्याकडे कोरोना लसीकरण प्रमाणपत्र वितरित करण्याची जबाबदारी असल्याचे बोलले जात आहे,असे असतांना संबंधित राजकीय नेते, अधिकारी, दबाव तंत्राचा वापर करणारे अधिकारी ,पोलीस कर्मचारी यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येऊन सदर प्रकरणाची सी.बी. आय.चौकशी करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे त्यावेळी संघटनेचे प्रवक्ता अँड.गणपत पाडवी, शहराध्यक्ष विनोद पाडवी, युवा अध्यक्ष विकास ठाकरे अंकुल पाडवी इत्यादी उपस्थित होते.








