नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील खापर परिसरात अवैधरित्या बायोडिझेल विक्री होत असल्याच्या तक्रारीवरून काल रात्री प्रातांधिकारी मैनांक घोष यांच्यासह पथकाने बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील चार ठिकाणी ढाबा व हॉटेल्सवर धाडी टाकत दोन ठिकाणी बायोडिझेलच्या साठवणूकीसाठी असलेल्या सुमारे २० लिटर क्षमतेच्या दोन भूमिगत टाक्या पथकाने जेसीबीच्या मदतीने काढून नष्ट केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, खापर ता.अक्कलकुवा परिसरात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अक्कलकुवा पोलिसांच्या मदतीने महसूल प्रशासनाने खापर परिसरातील हॉटेल महादेव, हॉटेल टीप टॉप, उदेपुर येथील हॉटेल हरी कृष्णा व गुलीउंबर येथील आर.टी.ओ. चेकपोस्टजवळील हॉटेल साईआनंद या ४ हॉटेल्सवर सायंकाळी ४ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत धाडी टाकत कारवाई केली.खापर परिसरात प्रांताधिकारी मैनांक घोष, तहसिलदार सचिन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी बायोडिझेलचा शोध घेऊनही बायोडिझेल मिळाले नाही .मात्र प्रांताधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासणी केली असता २० फूट खोल जमिनीत बायोडिझेलची टाकी आढळली.या २० हजार लिटरच्या टाकी
जेसीबीच्या मदतीने बाहेर काढून नष्ट करण्यात आली.सदर दरम्यान हॉटेल टीपटॉप येथेही धाड टाकत पत्र्यांचा शेड नष्ट केले तर हॉटेल हरीकृष्णा येथे २० हजार लिटरची रिकामी लोखंडी टाकी आढळली. हॉटेल साईआनंद येथे ५ हजार लिटरच्या ५ रिकाम्या व १ मिश्रित बायोडिझेल टाकी आढळून आली.तेथेही जेसीबीच्या मदतीने टाक्या नष्ट करण्यात आल्या. हॉटेल महादेव येथे बायोडिझेलची २० हजार लिटरची लोखंडी रिकामी टाकी हॉटेलच्या पाठीमागे जमिनीतुन मिळाली. जेसीबीच्या मदतीने सदरच्या टाक्या नष्ट करण्यात आल्या.सदरची कारवाईत प्रांताधिकारी डॉ.मैनांक घोष,अक्कलकुवा तहसिलदार सचिन मस्के, नायब तहसिलदार दिलीप गांगुर्डे, पुरवठा निरीक्षक जी.आर.बागले, अक्कलकुवा पोलिस निरीक्षक आय.एन.पठाण, गिरीष सांगळे, पोहेकॉ. मोहन शिरसाठ, कल्पेश कर्णकाळ, अजीत गावित आदींच्या पथकाने केली.








