म्हसावद l प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू करा अशा आशयाचे निवेदन आज रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा शहादाच्या वतीने शहादा तहसीलदार कुलकर्णी यांना देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना -19 या संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद करण्याचा आदेश राज्य शासनाने पारित केले आहे परंतु या आदेशाने विद्यार्थ्यांचा आतोनात शैक्षिणक नुकसान होत आहे म्हणून आज रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शहादा तालुका शाखेच्या वतीने दुर्गम भागात अथवा ग्रामीण भागातील परिसरात कोरोना पेशंट नाही अश्या सर्वसाधारण परिसरात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा सुरू करण्यात याव्या जेणेकरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकून राहण्यास मदत होईल. म्हणून शाळा सुरू करण्याबाबतच्या आशयाचे सदर निवेदन देण्यात आले. निवेदन देताना शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बैसाने , तालुका कार्यवाह संजय साळी, जिल्हा उपाध्यक्ष.रावसाहेब बावा, जिल्हा मुख्य सल्लागार,हिरालाल पाटील ,तालुका कार्याध्यक्ष रमेश वाडीले, तालुका कार्यालयिन मंत्री प्रकाश लांबोळे ,तालुका संघटन मंत्री अनिल सोनवणे ,तालुका उपाध्यक्ष नवलसिंग भीमसिंग राजपूत , मनोहर जगन्नाथ सैंदाने ,तालुका संपर्क प्रमुख संजय गिरासे ,तालुका सह संपर्कप्रमुख चंद्रकांत पाटील ,तालूका कार्याध्यक्ष राजेंद्र वाडीले,तालुका सहकार्यवाहक प्रमोद पाटील व दिनकर वसावे तालुका प्रसिद्धी प्रमुख अनुप राठोड आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.








